ETV Bharat / state

हळदीच्याच दिवशी नवरदेवाचा लग्नास नकार, नवरी लग्नमंडपी बेशुद्ध, नवरदेवाविरुद्ध गुन्हा दाखल

वसमत तालुक्यातील नवरा मुलगा याने कळमनुरी तालुक्यातील गोळवा येथील मुलगीच्या लग्नाकारीता मागणी घातली. लग्नाची तारीखही निश्चित झाली. एवढेच काय तर नवरदेवाची उष्टी हळदही नवरीला लागली. नवरीच्या दारी लग्न समारंभासाठी सप्तपदी विवाहाचा मंडपही सजला. परंतु हळद लागल्यावर नावरदेवाने लग्न मंडपात जाण्यासाठी नकार देत मुलीसोबत विवाह करण्यासच नकार दिला.

हळदीच्याच दिवशी नवरदेवाचा लग्नास नकार
हळदीच्याच दिवशी नवरदेवाचा लग्नास नकार
author img

By

Published : Mar 6, 2020, 6:27 AM IST

हिंगोली - जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील नवरा मुलगा याने कळमनुरी तालुक्यातील गोळवा येथील मुलगीच्या लग्नाकारीता मागणी घातली. लग्नाची तारीखही निश्चित झाली. एवढेच काय तर नवरदेवाची उष्टी हळदही नवरीला लागली. नवरीच्या दारी लग्न समारंभासाठी सप्तपदी विवाहाचा मंडपही सजला. परंतु हळद लागल्यावर नावरदेवाने लग्न मंडपात जाण्यासाठी नकार देत मुलीसोबत विवाह करण्यासच नकार दिला. या सर्व प्रकाराने मुलींच्या आई वडिलांच्या मनावर तर मोठा आघात झाला तर, नवरी मुलगीही चांगलीच हादरून गेली. सध्या तिच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एखाद्या चित्रपटात साजेल अशीच घटना सुकळी बु. येथे घडली आहे. याप्रकरणी नवरीच्या वडिलांच्या फिर्यादिवरून कुरुंदा पोलीस ठाण्यात नवरा मुलगा आणि त्याच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हळदीच्याच दिवशी नवरदेवाचा लग्नास नकार

रामभाऊ सांभाजी चौरे वधू पित्याचे नाव आहे. त्यांच्या मुलीचा विवाह ढोलक्याची वाडी येथील शिवप्रसाद पाचपूते यांचा मुलगा संदीप पाचपूते याच्यासोबत जुळला होता. 20 डिसेंबर रोजी साखरपूडा झाला. 3 मार्चरोजी विवाहाची तारीख निघाली पत्रिकाही वाटप केल्या. नवरीच्या लग्न असल्याने घरामध्ये सोहळ्याची संपूर्ण तयारी आटोक्यात आली होती. वऱ्हाडी मंडळी येणार असल्याचा अंदाज लावत स्वयंपाकही तयार केला होता. तर लग्न मंडपही टाकण्यात आला होता, सर्वकाही सुरळीत सुरू होते. दरम्यान, नवरदेवाला आणण्यासाठी पाहुणे गेले. मात्र, काही वेळात अचानकच नवरदेवाने लग्नाला नकार दिला. या प्रकाराने नवरीच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. काही काळ तर नवरीचे वडील एवढे गोंधळून गेले की, त्यांना काहीही कळेनासे झाले होते. यावेळी अनेकांनी त्यांची समजूत काढली, ते सावरलेही. मात्र, जी नवरी सजून धजून विवाह मंडपात जाणार होती, तिला तर हा सर्व प्रकार पाहून एवढे दुःख झाले की ती जमिनीवरच भुरळ येऊन पडली. त्यामुळे सर्वांनी तिच्याकडे धाव घेत तिला दवाखान्यात हलविले.

हेही वाचा - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची अज्ञाताकडून तोडफोड

या सर्व प्रकारामुळे विवाह मंडपाची सुरू असलेली तयारी थांबवून नवरीच्या वडिलांनी थेट कुरुंदा पोलीस ठाणे गाठून नवरदेव व त्याच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अद्याप या नवरदेवाला अटक केली नसून, वधूवर मात्र नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, या सर्व प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - हिंगोलीत अवकाळी पावसाची हजेरी; रब्बी पिकांचे अतोनात नुकसान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.