ETV Bharat / state

हिंगोलीत रेशनच्या काळ्या बाजारात वाढ; गोरेगावच्या गोदामातील काळाबाजार कॅमेऱ्यात कैद - गोरेगाव

चक्क मालवाहू ट्रकमध्ये काटा लावून सरकारकडून आलेल्या धान्यातील ५ ते १० किलो धान्य काढले जात आहे. गोरेगाव येथील गोदामात सुरू असलेला हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

गोरेगावच्या गोदामातील काळाबाजार कॅमेऱ्यात कैद
author img

By

Published : Jul 29, 2019, 9:03 PM IST

Updated : Jul 29, 2019, 11:12 PM IST

हिंगोली - पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यात रेशनचा काळा बाजार वाढला आहे. या काळ्या बाजाराचे मूळ खरोखरच थक्क करायला लावणारे आहे. चक्क मालवाहू ट्रकमध्ये काटा लावून सरकारकडून आलेल्या धान्यातील ५ ते १० किलो धान्य काढले जात आहे. त्यामुळे रेशन दुकानदारही हाच फंडा पुढे वापरत आहेत. हा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे गोरेगाव येथील गोदामात. येथेच नव्हे तर हाच प्रकार हिंगोली येथील गोदामातही सर्रासपणे सुरू आहे.

गोरेगावच्या गोदामातील काळाबाजार कॅमेऱ्यात कैद

हिंगोली जिल्ह्यातील रेशनचा माल घेऊन जाणारे ट्रकच्या ट्रक काळ्या बाजारत विक्री केले जात होते. मात्र, या रेशन माफियाचा काळा बाजार उघडकीस येऊन यात गळाला लागलेले मोठे मासे आजही जेलची हवा खात आहेत. शिवाय अजूनही या काळ्या बाजाराची चौकशी सुरू आहे. हे सर्व जग जाहीर असले तरी रेशनच्या काळा बाजार जराही कमी झालेला नाही. याहूनही भयंकर म्हणजे जिल्हा पुरवठा विभागाकडून मागणी केलेल्या प्रत्येक गहू व तांदळाच्या पोत्यातून ५ ते १० किलो धान्य काढून घेतले जात आहे. गोरेगाव येथील गोदामात सुरू असलेला हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

तर येथील कर्मचारी थेट मी याचा नातेवाईक आहे. माझ्या सर्व ओळखीचे आहेत, असे सांगून सर्रास काळाबाजार सुरूच ठेवत आहेत. तालुका आणि पुरवठा विभागाकडे रेशन संदर्भात तक्रारीचा पाऊस सुरू आहे. मात्र, यामध्ये वरिष्ठ अजिबात लक्ष घालत नसल्याने रेशन दुकानदारासह गोदामपालांनाही चांगलेच अभय मिळत आहे. परिणामी, लाभार्थ्यांच्या तोंडचा घास पळविण्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालणाऱ्या या गलथान पुरवठा विभागाची तक्रार कोणाकडे करावी ? असा प्रश्न आता लाभार्थ्यांना पडला आहे. तर याप्रकरणी काही लाभार्थी आता विभागीय आयुक्तांचे दरवाजे ठोठावणार आहेत.

रेशन कार्डसाठीही लाभार्थ्यांची हेळसांड

रेशन कार्डसाठीदेखील लाभार्थ्यांची मोठे हेळसांड सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. अनेकदा रेशन कार्ड मागणीसाठी लाभार्थी तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयात खेटे घेत आहेत. मात्र, त्यांना नेहमीच उडवाउडवीचे उत्तर देत वेळ मारून नेण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे रेशन दुकानदाराच्याही नांग्या चांगल्याच वर आल्या आहेत. ते लाभार्थ्यांसोबत अरेरावीची भाषा तर नेहमीच वापरत असून कधीकधी बळाचाही वापर करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यावर वरिष्ठ विभागाने लक्ष घालून अंकुश घालण्याची मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे.

Intro:*
हिंगोली- पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यात रेशनचा एवढा काळा बाजार वाढलाय की, या काळ्या बाजाराचे मूळ खरोखरच थक्क करायला लावणारे आहे. चक्क माल वाहू ट्रक मध्ये काटा लावून, सरकारकडून आलेल्या धान्यातील पाच ते दहा किलो काढले जातेय. त्यामुळे रेशन दुकानदार ही हाच फंडा पुढे वापरत आहेत. परिणामी, लाभार्थ्यांच्या तोंडचा घास पळविण्यावर कारवाई करण्याऐवजी त्याना पाठीशी घालणाऱ्या या गलथान पुरवठा विभागाची तक्रार कोणाकडे करावी ? असा प्रश्न आता लाभार्थ्यांना पडला आहे. हा भयंकर प्रकार उघडीस आलाय गोरेगाव येथील गोदामात. येथेच नव्हे तर हाच प्रकार हिंगोली येथील गोदामातही सर्रास पणे सुरू आहे.

Body:हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा वसमत आणि सेनगाव पाठोपाठ आता हिंगोली तालुक्यातही रेशनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. हा काळाबाजार एवढ्या टोकाला जाऊन पोहोचला आहे की थेट सरकारकडून लाभार्थ्यासाठी येणारे धान्य पूर्णच पळविण्याची बाब ही काय नवीन नाही. मात्र सर्व जाऊन उरलेल्या धान्यावर देखील गोदामात हात मारत लाभार्थ्यांच्या तोंडचा घास पळविला जातोय. या वरून दुसरे दुर्दैव कोणते. हिंगोली जिल्ह्यातील रेशनचा माल घेऊन जाणारे ट्रकच्या ट्रक काळ्या बाजारत विक्री केले जात होते. मात्र त्या रेशन मफियाचा हा काळा बाजार उघडकीस येऊन यात गळाला लागलेले मोठे मासे आज ही जेलची हवा खत आहेत. शिवाय अजून ही या काळ्या बाजाराची चोकशी सुरू आहे. हे सर्व जग जाहीर असले तरी ही. रेशनच्या काळा बाजार जराही कमी झालेला नाही. याहूनही भयंकर म्हणजे जिल्हा पुरवठा विभागाकडून मागणी केलेल्या रेशनच्या धण्यातून, गोदामात प्रत्येक गहू व तांदळाच्या कचाट्यातून पाच ते दहा किलो धान्य काढून घेतले जाते. गोरेगाव येथील गोदामात सुरू असलेला हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. तर येथील कर्मचारी थेट मी याचा नातेवाईक आहे, माझ्या सर्व ओळखिचे आहेत. असे सांगून, सर्रास काळाबाजार सुरूच ठेवत आहेत. तालुका आणि पुरवठा विभागाकडे रेशन संदर्भात तक्रारीचा पाऊस सुरू आहे मात्र वरिष्ठ अजिबात यामध्ये जराही लक्ष घालत नसल्याने रेशन दुकानदारासह गोदाम पालाही चांगलेच अभय मिळत आहे. आता हा प्रकार मात्र विभागीय आयुक्तांकडे जाणार आहे., काही लाभार्थी विभागीय आयुक्तांचे दरवाजे ठोठावणार आहेत. Conclusion:तसेच रेशन कार्ड साठी देखील लाभार्थ्यांची मोठे हेळसांड सुरू आहे अनेकदा दर्शन कार्ड मागणीसाठी लाभार्थी तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयात खेटे घेत आहेत. मात्र त्यांना नेहमीच उडवाउडवीचे उत्तर देत वेळ मारून नेण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे रेशन दुकानदाराच्या ही नाग्या चांगल्याच वर आल्यात. ते लाभार्थ्यास सोबत अरेरावीची भाषा तर नेहमीच वापरत असून, कधीकधी बळाचा ही वापर करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यावर वरिष्ठ विभागाने लक्ष घालून अंकुश घालण्याची मागणी लाभार्थ्यांतुन होत आहे.

हेच व्हिज्युअल ftp ही केलेले आहेत
Last Updated : Jul 29, 2019, 11:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.