ETV Bharat / state

लग्नाच्या 50 व्या वाढदिवसादिवशी कोरोनाशी लढण्यासाठी दिले 51 हजार रुपये

शिवप्रसाद झंवर यांनी लग्नाच्या 50 व्या वाढदिवसाचा खर्च टाळुन पंतप्रधान सहाय्यता निधीला 51 हजार रुपयांचा निधी दिला आहे. हा धनादेश सेनगाव येथील तहसीलदाराकडे जीवनकुमार कांबळे यांच्याकडे वर्ग सुपूर्द केला आहे.

golden jubilee marriage anniversary celebrate by giving money to pm care
लग्नाच्या 50 व्या वाढदिवसादिवशी कोरोनाशी लढण्यासाठी दिले 51 हजार रुपये
author img

By

Published : Apr 16, 2020, 1:44 PM IST

हिंगोली- कोरोना या महाभयंकर संकटाचा सामना करण्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. नागरिक आपल्या नेहमीच्या धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाला बगल देत निधी प्रधानमंत्री सहाय्यता निधीत जमा करत आहेत. शिवप्रसाद झंवर यांनी लग्नाच्या 50 व्या वाढदिवसाचा खर्च टाळून पंतप्रधान सहाय्यता निधीला 51 हजार रुपयांचा निधी दिला आहे. हा धनादेश सेनगाव येथील तहसीलदाराकडे जीवनकुमार कांबळे यांच्याकडे वर्ग सुपूर्द केला आहे. झंवर दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने लग्नाचा वाढदिवस साजरा करतात.

लग्नाच्या 50 व्या वाढदिवसादिवशी कोरोनाशी लढण्यासाठी दिले 51 हजार रुपये
शिवप्रसाद झंवर यांच्या लग्नाला गुरुवारी 50 वर्ष झाली आहेत. झंवर यांच्या लग्नाचा दरवर्षी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला जातो. मात्र, या वर्षी जगावर कोरोना सारख्या महाभयंकर आजाराचे संकट आहे. यातून सावरण्यासाठी प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहे. एवढेच काय तर कोरोनाशी लढण्यासाठी अनेकांनी मदत देखील केली आहे. आपणही समाजाचे काही देणे लागतो हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन झंवर कुटुंब मदतीसाठी पुढे आले आहे.

कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येक जण काही तरी मदत करत आहेत. कुणी अन्न धान्य तर कुणी सॅनिटायझर, काही जण तर बाहेर गावचे लोक हिंगोली शहरात अडकून पडलेत त्यांच्यासाठी भोजन पुरवत आहेत.त्यामुळेच झंवर कुटुंबियांनी देखील फुल ना फुलांची पाकळी म्हणून लग्न वाढदिवसाच्या रूपाने 51 हजार रुपयांची मदत केली आहे. यामुळे सर्वच स्तरातून झंवर कुटुंबियांचे कौतुक केले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.