हिंगोली - लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची २३ मे रोजी मोजणी होणार असून, मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशासनाच्यावतीने मतमोजणीची जय्यत तयारी सुरू आहे. हिंगोलीतील शासकीय तंत्रनिकेतन येथे ही मतमोजणी होणार आहे. यासाठी ८० टेबलवरून १४ फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार आहे. त्यासाठी सुरक्षेच्यादृष्टीने या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मतमोजणीवेळी उमरखेड किनवट कळमनुरी हिंगोली या ४ विधानसभेसाठी प्रत्येकी १४ फेऱ्या होणार आहेत. तर हादगाव आणि वसमत विधानसभा मतदार संघासाठी १२ फेऱ्या होणार आहेत. ४ पोस्टल बॅलेटसाठी तर टेबलवरून ईटीपीबीएसटी मत मोजणी होणार आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली. या निवडणुकीत हिंगोली - ३३७, वसमत- ३२३, हदगाव- ३२०, किनवट- ३२८, उमरखेड- ३४३, कळमनुरी - ३४६ अशा एकूण १ हजार १९७ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
हदगाव आणि वसमत विधानसभा मतदार संघात कमी मतदान केंद्र असल्यामुळे केवळ १२ फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. तर यावर्षी पहिल्यांदाच ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट मशीनचा केल्यामुळे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मतमोजणी होणार आहे.