ETV Bharat / state

...अन् 'त्या' शेतकऱ्यांनी जुगाडकरून पिकांना दिली नव संजीवनी

हिंगोली तालुक्यातील मालसेलू येथील शेतकरी नवनाथ गणेशराव देशमुख यांच्याकडे वीस ते पंचवीस एकर शेती आहे. ते शेतातील सर्वच कामे ट्रॅक्‍टरच्या साह्याने करतात. नांगरणीपासून ते पिकांना पाणी देणे व मळणी यंत्रातून पीक काढणीपर्यंत कुठेही बैल जोडीची गरज पडत नाही. हीच संधी साधून नवनाथ देशमुख यांनी ट्रॅक्टरवर इंजन जोडले.

शेतकरी
शेतकरी
author img

By

Published : Jun 27, 2021, 5:49 PM IST

हिंगोली - शेतकऱ्यांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी सावरत पेरणी केली आहे. मात्र पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली. यामुळे पुन्हा शेतकऱ्याला नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे पिकाला पाणी पुरविणे शक्य होत नाही. मात्र पिकाला जगविण्यासाठी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने अस्सल जुगाडकरून आपल्या शेतातील पिकांना नव संजीवनी दिली आहे.

शेतकऱ्यांनी जुगाडकरून पिकांना दिली नव संजीवनी
असे बनविण्यात आले जुगाड

हिंगोली तालुक्यातील मालसेलू येथील शेतकरी नवनाथ गणेशराव देशमुख यांच्याकडे वीस ते पंचवीस एकर शेती आहे. ते शेतातील सर्वच कामे ट्रॅक्‍टरच्या साह्याने करतात. नांगरणीपासून ते पिकांना पाणी देणे व मळणी यंत्रातून पीक काढणीपर्यंत कुठेही बैल जोडीची गरज पडत नाही. हीच संधी साधून नवनाथ देशमुख यांनी ट्रॅक्टरवर इंजन जोडले. याच इंजनच्या साह्याने विद्युत प्रवाह तयार करून मोटारीला विद्युत प्रवाह दिला. या जुगाडाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एका तासाला मोठ्या शेती क्षेत्रात सिंचन पुरवठा करता येत आहे. यामुळे पिकाला जगविण्याच्या या जुगाडाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.

शेतकऱ्यांसाठी देखील उपयुक्त आहे ही उपायोजना

सध्याच्या खरीप पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. मात्र पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. त्यामुळे ट्रॅक्‍टर चालकांनी हीच संधी साधत ट्रॅक्टरवर हे जुगाड तयार केलेले आहे. यातून शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रश्न सुटत असून ट्रॅक्टर मालकांना देखील बऱ्याच प्रमाणात नफा मिळत आहे. शिवाय या यंत्राचा वापर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे या यंत्राच्या वापराबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा -कोरोनाची आकडेवारी लपवणाऱ्या राज्यांमध्ये मृतदेह गंगेच्या कडेला साचले - महसूलमंत्री थोरात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.