ETV Bharat / state

जात दाखवा अन शेती माल विक्री करा, नाफेडच्या अजब फंड्याने शेतकरी संतापले - News about farmers in Hingoli

निसर्गा समोर हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आता नाफेड केंद्रावर आपला शेती माल विक्री करण्यासाठी नोंद करताना जात दाखवावी लागणार आहे. त्याशिवाय शेतीमाल विक्री करू शकणार नसल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोलीत समोर आला आहे.

farmer-is-being-asked-about-his-community-at-the-nafed-agricultural-purchase-center
जात दाखवा अन शेती माल विक्री करा, नाफेडच्या अजब फंड्याने शेतकरी संतापले
author img

By

Published : Feb 26, 2020, 5:47 PM IST

हिंगोली - निसर्गा समोर हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आता नाफेड केंद्रावर आपला शेती माल विक्री करण्यासाठी नोंद करताना आता जात दाखवावी लागणार आहे. त्या शिवाय शेतकरी शेती माल विक्री करू शकणार नसल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोलीत उघडा झाला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अजूनही समाधानकारक भाव मिळाला नसला तरीही तोच माल आता विक्रीसाठी जात विचारल्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.

जात दाखवा अन शेती माल विक्री करा, नाफेडच्या अजब फंड्याने शेतकरी संतापले

शेतकऱ्यांची खाजगी बाजारात होणारी लूट थांबून शेतकऱ्याला ऐन दुष्काळ सदृश्य परिस्थितीत दिलासा मिळावा म्हणून केंद्र शासनाने तूर व हरभरा हमी भाव दराने खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात नाफेड केंद्र सुरू केले आहेत. या केंद्रावर शेती मालाची विक्री करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. 15 मार्च पर्यंत नोंदणी केली जाणार आहे. मात्र, नोंदणी करताना शेतकऱ्यांची माहिती भरताना चक्क शेतकऱ्यांना जात विचारली जात आहे. या प्रकाराने शेतकरी चांगलेचग गोंधळून जात आहेत. विशेष म्हणजे मोठ्या कष्टाने पिकविलेल्या शेती मालाच्या विक्रीसाठी प्रवर्गनिहाय वर्गीकरण नेमके कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नोंदणीच्या रकाण्यामध्ये ऑदर बॅकवर्ड क्लासेस, शेड्युल कास्ट, शेड्युल ट्राईब, जनरल आणि इतर असा उलेख करण्यात आलेला आहे. नोंदणीसाठी एकूण जातींपैकी तुमची जात कोणत्या फॉरमॅट मध्ये बसतेय याची थेट विचारणा करूनच पुढे नोंदणी होत आहे. सर्वच शेतकऱ्याच्या शेती मालाला एकच दर निश्चित केलेला असताना आता जातीची काय भानगड आहे. मात्र, जात विचारल्यानंतर काही वेगळी योजना आहे की काय? असा उलट प्रश्न शेतकरी करीत आहेत. या प्रकाराने मात्र नाफेड केंद्रावर आता गोंधळ उडण्याची दाट शक्यता आहे. याबाबत स्वाभिमाणी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी तहसीलदाराला निवेदन दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.