ETV Bharat / state

हिंगोलीत शॉक लागून शेतकऱ्यांचा मृत्यू; विद्युत वितरणचा भोंगळ कारभार - हिंगोलीत शॉक लागून शेतकऱ्यांचा मृत्यू

रामजी कांबळे (२७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

रामजी कांबळे
author img

By

Published : Nov 21, 2019, 11:04 PM IST

Updated : Nov 21, 2019, 11:20 PM IST

हिंगोली - सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे फवारणी करताना शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारांच्या स्पर्शाने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. रामजी कांबळे (२७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. चार दिवसांपूर्वीही एका तरुणाचा हळदीला पाणी देताना शॉक लागून मृत्यू झाला होता.

हिंगोलीत शॉक लागून शेतकऱ्यांचा मृत्यू; विद्युत वितरणचा भोंगळ कारभार

कांबळे हे शेतात तूर व कपाशीची फवारणी करत होते. दरम्यान, शेतात पडलेल्या विजेच्या तारांना त्यांचा स्पर्श झाला आणि ते जोराने ओरडले व जागीच पडले. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती सेनगाव पोलीस ठाण्याला देताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. शेतामध्ये विद्युत तारा पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार उघडकीस आला.

विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकातून होत आहे. याच आठवड्यात सेनगाव परिसरात एका तरुणाचा पिकाला पाणी देताना शॉक लागून मृत्यू झाला होता. त्यामुळे आता विद्युत वितरण कंपनी ही शेतामध्ये तुटून पडलेल्या तारांसंदर्भात किती गांभीर्याने घेते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Intro:

हिंगोली- सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे फवारणी करताना शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारांना स्पर्श एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आलीय. चार दिवसांपूर्वी ही एका तरुणाचा हळदीला पाणी देताना मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा ही घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Body:रामजी कांबळे (२७) असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे कांबळे हे शेतात तूर व कपाशी ची फवारणी करीत दरम्यान शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारांना त्यांचा स्पर्श झाला अन ते जोराने ओरडले व जागीच पडले. यात त्यांचा मृत्यू झालाय. घटनेची माहिती सेनगाव पोलिस ठाण्याला कळतात पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. शेतामध्ये विद्युत धारा पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार उघडकीस आला. Conclusion:विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकातून होत आहे. यात आठवड्यात सेनगाव परिसरात एका तरुणाचा पिकाला पाणी देताना मृत्यू झाला होता ही घटना आठवीतील जाते न जाते तोच आता ही घटना घडल्यामुळे विद्युत वितरण शेतामध्ये तुटून पडलेल्या तारांसंदर्भात किती गांभीर्याने घेत आहे, हेच समोर येतेय.
Last Updated : Nov 21, 2019, 11:20 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.