ETV Bharat / state

हिंगोली : कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - hingoli news

राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र थांबायचं नावच घेत नाही.

Farmer commits suicide in Hingoli
हिंगोलीत शेतकऱ्याची आत्महत्या
author img

By

Published : Oct 31, 2020, 7:15 AM IST

Updated : Oct 31, 2020, 7:52 AM IST

हिंगोली- राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र थांबायचं नावच घेत नाही. पुन्हा एका कर्जबाजारी शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे घडली.

...म्हणून केली आत्महत्या

देवजी झुंगरे (51) असे मृत शेतकऱ्याचं नाव आहे. यंदा परतीच्या पावसाने शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. हाती आलेल्या शेती मालातून भांडवली खर्चही निघाला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी हे चिंतेत आहेत. त्यापैकीच एक झुंगरे हे चिंतातूर झाले होते. त्यांच्यावर भारतीय स्टेट बँकेचे 90 हजार रुपयांचे कर्ज आहे. शेतमाल विकून हे कर्ज फेडायचं होते. पण परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. हाती आलेल्या शेती मालातून कर्ज कसे फेडायचे, हीच चिंता झुंगरे यांना भेडसावत होती. त्यामुळे झुंगरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी पत्नी असा परिवार आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून कळमनुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचा पहिला बळी

यवतमाळ जिल्ह्यात यापूर्वी ओल्या दुष्काळाचा पहिला बळी गेला आहे. महागाव तालुक्यातील उटी येथील शेतकऱ्याने वीजेची तार पायाला गुंडाळून आत्महत्या केली होती. त्यामुळे पंचनामा नको मदत करा, अशी मागाणी शेतकरी करीत आहेत.

सोलापूरात युवा शेतकऱ्याची आत्महत्या

शहरातील शेतकऱ्याने नरोटेवाडी येथील शेतात जाऊन विष घेऊन आत्महत्या केली होती. अण्णासाहेब रामचंद्र भोसले-गवळी (वय 36) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची नरोटेवाडी येथे 5 एकर शेतजमीन आहे. लॉकडाऊन व अतिवृष्टीमुळे कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती.

कर्ज काढून दुबार पेरणी केली मात्र

परतीच्या पावसाने पिकांचे झालेले नुकसान, त्यामुळे, अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना भातकुली तालुक्यातील खोलापूर पांढरी या गावात 3 ऑक्टोबरला घडली. ज्ञानेश्वर रामाराव सरोदे, असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सरोदे यांच्यावर भारतीय स्टेट बँक व काही इतर कर्ज असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. सरोदे यांच्याकडे एकूण ६ एकर शेती आहे. त्यापैकी यावर्षी त्यांनी ४ एकर शेतीमध्ये कपाशी आणि तूर पिकाची, तर २ एकर वर सोयाबीन पिकाची लागवड केली होती. पहिल्यांदा पेरनी केलेले सोयाबीन बियाने बोगस निघाल्याने ते उगवलेच नाही. त्यानंतर दुबार पेरणीचे संकट आले. कर्ज काढून दुबार पेरणी केली. मात्र, नंतर खोडकिड आणि आता परतीच्या पावसामुळे सोयाबीन पीक पूर्णत: खराब झाले. त्यात हातातोंडाशी आलेले कपाशीचे पीकही नष्ट झाले. त्यामुळे, लोकांचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून सरोदे यांनी विष प्राशन करून जीवन यात्रा संपवली.

हेही वाचा-'खडसेच काय.. मुख्यमंत्री पद भूषवणारे गेल्यावरही भाजपाला फरक पडला नाही'

हेही वाचा-शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात 'त्या' 12 जागांसाठी पुन्हा एकदा चर्चा

Last Updated : Oct 31, 2020, 7:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.