ETV Bharat / state

हिंगोलीत विष पिऊन शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, उपचार सुरू - हिंगोली शेतकरी आत्महत्या प्रयत्न

सलग नऊ दिवस पावसाच्या हाहाकारामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरिपाचे पीक वाया गेल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच धक्का सहन न झालेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

प्रकाश इंगोले
author img

By

Published : Nov 2, 2019, 12:26 PM IST

हिंगोली - सलग नऊ दिवस पावसाच्या हाहाकारामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीपाचे पीक वाया गेल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच धक्का सहन न झालेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या शेतकऱ्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सरकारने अजुनही मदत न केल्याने या घटना घडत असल्याचे समोर येत आहे.

farmer suicide
हिंगोलीत विष घेऊन शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

हेही वाचा - ४ नोव्हेंबरला राज्यात नवीन राजकीय समीकरण? शरद पवार घेणार सोनिया गांधी यांची भेट

प्रकाश इंगोले या शेतकऱ्याचा प्रयत्न केला होता. हिंगोली जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पूर्णता कंबरडेच मोडले आहे. हातातोंडाशी आलेला घास आपल्या डोळ्यादेखत वाय गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे अनेकांची स्वप्न धुळीत मिसळली आहेत. या हंगामात डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, पीक वाया गेल्याने ती पूर्णपणे फोल ठरली आहे.

इंगोले यांना तीन एकर शेती असून, डोक्यावर 80 हजार रुपयाचे कर्ज आहे. संतधार पावसाच्या या फटक्याने ते खचून गेले होते. त्यामुळे त्यांनी कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही बाबा घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले.

सध्या प्रशासन स्तरावर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे केले जात आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आशेने बांधावर उभे राहून पंचनाम्यासाठी येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करीत आहेत.

हेही वाचा - सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे - सदाभाऊ खोत

Intro:*
हिंगोली- जिल्ह्यात सलग 9 दिवस पावसाने हजेरी लावलीय. यात शेतीचे अतोनात नुकसान झालेय. एवढेच नव्हे तर हातातोंडाशी आलेला घास ही या निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतलाय. याचा धक्का जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना बसला असून, धक्का सहन न झालेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. सध्या शेतकऱ्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातूनच ओला दुष्काळ शेतकऱ्याच्या जीवावर बेतल्याचे पुन्हा एकदा समोर आलेय.

Body:प्रकाश इंगोले अस शेतकऱ्याचे नाव आहे. हिंगोली जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पूर्णता कंबरडेच मोडले आहे. हातातोंडाशी आलेला घास आपल्या डोळ्यादेखत निसर्गाच्या अवकृपेमुळे पूर्णता पाण्यात गेलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे अनेकांचे स्वप्न धुळीत मिसळलेय. या हंगामात डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती; मात्र पावसामुळे ती पूर्णपणे फोल ठरली आहे. इंगोले यांना तीन एकर शेती असून, डोक्यावर 80 हजार रुपयाचे कर्ज आहेConclusion:. संतधार पावसाच्या या फटक्याने ते खचून गेलेत. त्यामुळे त्यांनी कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून इंगोले यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. ही बाग घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे. या कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रिपब्लिकन सेना धावून आलीय. यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख किरण घोंगडे, मनोज मुळे, अविनाश मुळे, सुनील नागरे यासह उंडेगाव येथील काही नागरिक शेतकऱ्या दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत.
सध्या प्रशासन स्तरावर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे केले जात आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आशेने बांधावर उभे राहून पंचनाम्यासाठी येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.