हिंगोली- येथील दसरा महोत्सव सर्वदूर प्रसिद्ध आहेत. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसरा महोत्सव रद्द करावा लागला. त्यामुळे गावातील मुख्य आकर्षण असलेल्या रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची उंची देखील कमी केली होती. गतवर्षी 51 फुटी राहणारा प्रतिकात्मक पुतळा यंदा केवळ 5 फूट करण्यात आला होता. यावर्षी दसरा महोत्सव साध्या पद्धतीने पार पडला. प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी योग्य खबरदारी घेण्यात आली.
हेही वाचा-शिवसेना दसरा मेळावा : पक्षातील खासदार; आमदारांच्या प्रतिक्रिया
हिंगोली जिल्ह्याचे वैभव असलेला सार्वजनिक दसरा महोत्सव हा डोळ्यांचे पारणे फेडणारा राहतो. यातील मुख्य आकर्षण असलेला क्षण म्हणजे रावण दहन, हा क्षण पाहण्यासाठी जिल्ह्यातीलचं नव्हे तर इतर जिल्ह्यातून लोक आवर्जून येतात. त्यामुळे येथे लाखो रुपयांची उलाढाल होते. अनेकांना रोजगार देखील उपलब्ध होतो. मात्र यावर्षी कोरोनामुळे हा महोत्सव रद्द केला. त्यामुळे प्रत्येकांच्या आनंदावर पाणी फिरले आहे.
हेही वाचा-दसरा स्पेशल: मीरा भाईंदर येथे कोविड योद्ध्यांचे शस्त्रपूजन
गत वर्षी या महोत्सवात मुख्य आकर्षण असलेल्या रावणाचा प्रतिकात्मक पुतळा हा 51 फुटी होता. सोबतच रावणाची बहीण सुपरनखेचा ही प्रतिकात्मक पुतळा हा रावणाच्या खालोखाल राहतो. यंदा मात्र कोरोनामुळे महोत्सवाची जागाही बदलण्यात आली होती. साधेपणाने 5 फूट रावणाचे दहन करण्यात आले. यावेळी प्रशाकीय अधिकारी व खकीबाबा मठाचे महंत कोशल्या दास महाराज उपस्थित होते.