ETV Bharat / state

लॉकडाऊनचा परिणाम टरबुजाच्या पिकावर, शेतकऱ्याने विकले १ रुपयात एक टरबूज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व काही बंद पडले आणि शेतातील मालाची वाहतूक करता आली नाही. त्यामुळे शेतकरी मोरे यांचे जवळपास एकर भरातील टरबूज जागीच खराब झाले. शेवटी तोडून ठेवण्यापेक्षा काही तरी पदरात पडतील या आशेपोटी मोरे यांनी प्रति एक रुपयेप्रमाणे 1हजार 200 टरबुजांची व्यापाऱ्याला विक्री केली. तर, लहान टरबूजे गावकऱ्यांना मोफत दिली.

लॉकडाऊनमुळे शेतमालाची वाहतूक अडकली, शेतकऱ्याने विकले १ रुपयात एक टरबूज

author img

By

Published : May 10, 2020, 11:20 AM IST

Updated : May 10, 2020, 1:36 PM IST

हिंगोली - कोरोना हा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा शेती माल हा अक्षरशः शेतात सडून गेला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. जिल्ह्यातल्या अशाच वरुड काजी येथील टरबूज उत्पादक शेतकऱ्याला कोरोनाच्या फाटक्यामुळे एक रुपयाप्रमाणे 1 हजार 200 टरबूज विकण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे. शांताराम मोरे असे टरबूज उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतकऱ्याने विकले १ रुपयात एक टरबूज

शेतकरी मोरे यांनी एकरभरमध्ये टरबुजाची लागवड केली होती. यावर्षी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने त्यांनी खताचे योग्य प्रमाण आणि पाणी वेळेवर टरबूजाच्या पिकाला दिले. त्यांनी टरबुजांवर जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपयांचा खर्च केला. मात्र, टरबूज तोडणीच्या काळात कोरोना सुरू झाला आणि काहीच दिवसांमध्ये हा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण जगभरात महाराष्ट्रातही उपायोजना सुरू झाल्या. त्याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व काही बंद पडले आणि शेतातील मालाची वाहतूक करता आली नाही. त्यामुळे शेतकरी मोरे यांचे जवळपास एकर भरातील टरबूज जागीच खराब झाले. शेवटी तोडून ठेवण्यापेक्षा काही तरी पदरात पडतील या आशेपोटी मोरे यांनी प्रति एक रुपयेप्रमाणे 1 हजार 200 टरबुजांची व्यापाऱ्याला विक्री केली. तर, लहान टरबूजे गावकऱ्यांना मोफत दिली.

या टरबूज विक्रीतून जवळपास एक लाख रुपयांचा उत्पन्न खर्च आणि नफा मिळण्याची अपेक्षा शेतकरी मोरे यांना होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व स्वप्नांवर पाणी फिरले आहे. वास्तविक पाहता मोरे हे या टरबूज विक्रीतून खरिपाच्या पेरणीसाठी खते बी-बियाणे घेण्याच्या तयारीत होते. मात्र, हातचं सर्वच गेल्यामुळे मोरे हे चांगलेच हतबल झाले आहेत. त्यामुळे यावर्षी खरिपाची पेरणी आटोपण्यासाठी मला नातेवाईकांची मदत घेण्याची वेळ येणार असल्याची खंत त्यांनी 'ईटीव्ही भारत'जवळ व्यक्त केली. आता निदान सरकारने आमच्याकडे बघून काहीतरी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मोरे यांनी केली आहे.

Last Updated : May 10, 2020, 1:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.