ETV Bharat / state

Hingoli Monsoon : वसमत तालुक्यात मुसळधार पावसाने तलावाची फुटली भिंत; अनेकांच्या घरात शिरले पाणी

वसमत शहर परिसरात काल सायंकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले. जवळपास तासभर मुसळधार पाऊस झाला. तसेच वसमत येथील दर्गा परिसरात मोठ्या तलावाची भिंत फुटली आहे. यामुळे अनेक कुटुंबांच्या घरात पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर मुले-बाळे घेऊन घरातील पलंगावर उभे राहून रात्र काढावी लागल्याची माहिती, नागरिकांनी दिली.

Hingoli News
तलावाची फुटली भिंत
author img

By

Published : Jul 28, 2023, 4:15 PM IST

माहिती देताना माहिला नागरिक

हिंगोली : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसमत परिसरात काल सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पावसामुळे दर्गा परिसरातील मोठा नावाने ओळखल्या जाणाऱ्या तलावाची भिंत फुटली. भिंतीला लागूनच असलेल्या अनेक घरात पाणी शिरले. पाण्याचा वेग एवढा होता की, नागरिकांना नेमके काय करावे हे सुचले नाही. यात अनेकांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले, अन्नधान्य देखील वाहून गेल्याने नागरीकांसमोर जगण्याचा प्रश्न निर्णय झाला आहे.

घरातील साहित्य वाहून गेले : घरात अचानक पाणी आल्याने, शेळ्या वाहून गेल्या. तलावातील गाळ आजही अनेकांच्या घरासमोरच तर काहींच्या घरात साचलेला आहे. त्या गाळातून चालणे कठीण होऊन बसले आहे, तर या गाळात अनेकांच्या दुचाकी देखील रुतून पडल्या आहेत. प्रशासनाने अडीचशे लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असले तरी, अनेकांच्या घरातील साहित्य वाहून गेल्याने, पुढे जीवन जगायचे कसे? असा प्रश्न डोळ्यासमोर उभा ठाकला आहे. दरम्यान अनेक भागांमध्ये नगरपरिषदेने नाले व गटारी स्वच्छ न केल्यामुळे नाल्यांमधील पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले आहे.

पाच हजार रुपये प्रति कुटुंब मदत : या भागामध्ये जवळपास 80 कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या कुटुंबांना प्रशासन स्तरावर तात्काळ मदत म्हणून पाच हजार रुपये प्रति कुटुंब जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जाहीर केले आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली आहे. तसेच प्रशासन स्तरावर जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न देखील केला जाणार असल्याचे, त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा -

  1. Thane Landslide News: दरड कोसळण्याचे सत्र सुरूच; मुंब्य्रात दरड कोसळल्यामुळे ४५ कुटुंबांचे स्थलांतरण
  2. Kolhapur Flood Update : कोल्हापूरसाठी पुढील 24 तास महत्त्वाचे; धरण क्षेत्रातील मुसळधार पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ
  3. Nanded Rain Update: नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, दोन तरुण गेले वाहून... काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.