हिंगोली- वसमत शहरातील बुधवार पेठ भागात रस्त्याने जाणाऱ्या एका सहा वर्षीय चिमुरड्यावर कुत्र्याने हल्ला करून त्याचे लचके तोडल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. चिमुरड्याने आरडा-ओरडा केल्याने नागरिकांनी धाव घेऊन त्या चिमुकल्याची सुटका केली.
हिंगोली जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरातील रस्त्यावर मोकाट कुत्री फिरत आहेत. कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुरड्यावर वसमत येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिमुरड्या सोबतच एका महिलेवर देखील कुत्र्याने हल्ला केला आहे. यामध्ये महिला देखील जखमी झाली आहे. कुत्रे अचानक हल्ला करत असल्याचे पाहून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगर पालिकेच्या वतीने मोकाट कुत्र्यांवर अजून तरी निरबीजिकरणाची प्रक्रिया राबवलेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढतच चालली आहे. कुत्र्याने चिमुरड्यावर हल्ला केल्याने वसमतकर मात्र चांगलेच हादरून गेले आहेत. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
हेही वाचा - तब्बल साडे तीन लाखांचे मोबाईल चोरणाऱ्यांना पोलिसांनी अवघ्या चार तासात पकडले