ETV Bharat / state

डॉक्टने वाचवला शेतकऱ्याचा जीव; कर्जबाजारीपणाला कंटाळून घेतले होते विष - पावसाळा

हिंगोलीतील हाताळा गावातील एका ३० वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळऊन विष घेतले होते. वेळीच उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला आहे.

मृत्युच्या दाढेतून बचावलेला शेतकरी
author img

By

Published : Jul 4, 2019, 9:50 AM IST

Updated : Jul 4, 2019, 10:09 AM IST

हिंगोली - डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रमाणात आजही कमी झालेले नाहीत. मात्र, त्या हल्ल्यांचा अजिबात विचार न करता डॉक्टर आपले कर्तव्य चोखपणे पार पाडतात. त्यामुळे डॉक्टर हा खरोखरच रुग्णांसाठी देवा प्रमाणेच आल्याचा अनुभव हिंगोलीत कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका शेतकऱ्याला आला आहे. या शेतकऱ्याने विष घेतले होते. मात्र, वेळेवर उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला आहे.

मृत्यूच्या दाढेतून शेतकऱ्याला डॉक्टरांनी वाचविले

उमेश प्रकाश काळे (वय ३० वर्षे) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सेनगाव तालुक्यातील हाताळा येथे राहणाऱ्या उमेश काळेच्या वडिलांनी विविध बँकांचे, खासगी आणि सावकारी कर्ज घेतले आहे. ते कर्ज फेडायच्या चिंतेने २५ जून रोजी उमेशने घरीच विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हा प्रकार लक्षात येताच घरच्यांनी त्याला गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. तिथे डॉक्टरानी प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हासामान्य रुग्णालयात पाठविले. मात्र, उमेशची प्रकृती गंभीर असल्याने, सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला नांदेड येथे जाण्यास सांगितले. रुग्णवाहिकेने नांदेडकडे निघाले ही होते. मात्र. प्रकृती गंभीर असल्याने नांदेड पर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे उमेशच्या नातेवाईकानी त्याला शहरातीलच एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर डॉ. श्रीराम राठोड, डॉ. भानुदास वामन, डॉ. रवी पाटील यांच्यासह त्यांच्या पथकाने प्रयत्नांची पराकाष्टा करून उपचार केले आणि त्याला वाचविण्यात यशही आले.

एवढेच नाही, तर शेतकऱ्याची घरची परिस्थिती अतीशय हलाकीची असल्याने, याच रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभ दिला. यामुळे त्याचे सर्व उपचार योजनेअतर्गंत करण्यात आले. डॉक्टरांच्याच प्रयत्नामुळे आज मी जिवंत असून डॉक्टरांचे उपकार आयुष्य भर फेडू शकत नसल्याचे उमेशने सांगितले.

Intro:आजही डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रमाणात कमी झालेले नाही. मात्र त्या हल्ल्याचा अजिबात विचार न करता डॉक्टर आपले कर्तव्य चोक पणे पार पाडतात. त्यामुळे डॉक्टर हा खरोखरच रुग्णांसाठी एका देवदत्ता प्रमाणेच आल्याचा अनुभव हिंगोलीत एका कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या एका शेतकऱ्याला आलाय. जे की अवघ्या काही वेळात प्राणज्योत मालवणात तोच वेळेवर उपचार मिळाल्याने मी फक्त डॉक्टर मुळे माझ्या मुलांचा वडील जिवंत राहिल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्याने दिली. डॉक्टर अन रुग्णाचे एक वेगळे नाते कायम आल्याचा संदेशच या घटनेने दिलाय. उमेश प्रकाश काळे(३०) अस या शेतकऱ्यांच नाव आहे.

Body:सेनगाव तालुक्यातील हाताळा येथील उमेश काळे या शेतकऱ्यांने वडिलांवर विविध बँकेचे, खाजगी अन सावकारी कर्ज झाल्याने, ते कर्ज फेडायच्या चिंतेने २५ जून रोजी घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घरच्यांच्या लक्षात येताच काळे यांना गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. तिथे डॉक्टरानी प्राथमिक उपचार करून, जिल्हासामान्य रुग्णालयात रेफर केले. तेथे उपचार केले मात्र काळे यांची प्रकृती गंभीर असल्याने, सामान्य रुग्णालयातील डॉक्टराने त्यांना नांदेड येथे रेफर केले होते, १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकाने नांदेड कडे निघाले ही होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने नांदेड प्रयत्न पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे काळे यांच्या नातेवाईकानी त्यांना शहरातीलच एका खाजगी जगदंबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्यांच्यावर डॉ. श्रीराम राठोड, डॉ. भानुदास वामन, डॉ. रवी पाटील यांच्यासह त्यांच्या टीम ने प्रयत्नांची प्रकष्टा करून उपचार केले. अन त्याला यशही आले. एवढेच नव्हे तर शेतकऱ्याची घरची अतीशय हलाकीची परिस्थिती असल्याने, याच रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनंतर्ग लाभ दिला. अन सर्व उपचार मोफत करण्यात आले. काळे यांचे प्राण वाचलेत यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. तर डॉक्टरांच्याच प्रयत्नामुळे आज मी जिवंत असून, डॉक्टरांचे उपकार आयुष्य भर फेडू शकत नसल्याचे काळे यांनी सांगितले. आज ही प्रयत्नांची बाजी लावल्या नंतर एखाद्या रुग्णाने उपचारास प्रतिसाद दिला नाही अन तो दगावला तर त्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा शोध घेत त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय. जर डॉक्टर मिळाला नाही तर नातेवाईक रागाच्या भरात रुग्णालयाची तोडफोड करतात. मात्र तेच डॉक्टर जीवाची जराही पर्वा न करता रुग्णाला वाचविण्यासाठी प्रयत्न करतात.

Conclusion:हेच हिंगोली येथील खाजगी डॉक्टर टिम ने आज दाखवून दिलंय. विशेष म्हणजे एक रुपयाही रुग्णांकडून खर्च न घेता, शेतकऱ्यांला मृत्यूच्या दहाडेतुन बाहेर काढल्याने डॉक्टर अन रुग्णाचे एक वेगळे नाते कायम असल्याचा संदेशच दिलाय. तर
रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरांचे आभार मानलेत.
Last Updated : Jul 4, 2019, 10:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.