हिंगोली - जिल्हा परिषद आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतनश्रेणीसह निवृत्ती वेतनाच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
हेही वाचा - तरुणीचा चोरून काढलेला व्हिडिओ टिक-टॉकवर व्हायरल करणे पडले महागात
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्यावतीने मागील 20 वर्षांपासुन कर्मचाऱ्यांना सुधारीत वेतनश्रेणी लागु करण्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी 11 जुलै 2018 मध्ये नागपुरमध्ये लाँगमार्च काढला होता. यानंतरही संघटनेने अनेक आंदोलने करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, शासनाकडुन यासंदर्भात दखल घेतली जात नाही. त्यामुळेच मंगळवारी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष तुळशीराम कुंदरगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - हिंगोलीत रोड रोमिओंना वाहतूक शाखेचा दणका; 25 वाहने जप्त
या आंदोलनाच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगर पालिका आणि जिल्हा परिषद प्रमाणे वेतनश्रेणी मंजुर करावी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागु करावे, कर्मचाऱ्यांची भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधी संघटन कार्यालयात जमा करावी, सुधारीत वेतणश्रेणी लागु करण्यासाठी लादलेली वसुलीची अट रद्द करावी यासारख्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. दरम्यान, या आंदोलनात जिल्हा सचीव भारत धवसे, नागसेन खंदारे, शामराव सावळे, छाया ठाकरे, प्रल्हाद गाढवे आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.