हिंगोली - आधीच परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाले होते, अशातच बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे रब्बीच्या पिकांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, ओंढा नागनाथ, सेनगाव भागात बुधवारी रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटांसह गारांचा पाऊस झाला. त्यानंतर आज सकाळीही एक तास पाऊस झाला. त्यामुळे गहू, हरभरा, टोमॉटो यांचे नुकसान झाले आहे.
हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिराहून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.