ETV Bharat / state

नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी नरसीत भाविकांची मांदियाळी

संत नामदेव महाराजांचे जन्मगाव असलेल्या नरसी येथे परतवारी एकादशीनिमित्त शेकडो दिंड्या नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी दाखल झाल्या आहेत.

author img

By

Published : Jul 28, 2019, 5:57 PM IST

नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी नरसीत भाविकांची मांदियाळी

हिंगोली - जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे आज सकाळी 5 वाजल्यापासून परतवारीनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. संत नामदेव महाराजांचे जन्मगाव असलेल्या नरसी येथे परतवारी एकादशीनिमित्त शेकडो दिंड्या नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी आल्या आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त भाविक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. हेच भाविक आज संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी आले आहेत. आषाढी वारीनिमित्त अनेक संत मंडळी विठ्ठलाच्या दर्शनाला जात होते. यामध्ये विठ्ठलाचे लाडके भक्त म्हणून संत नामदेव महाराज हे सुद्धा जात होते. त्यामुळे पंढरपूरची वारी करणारे भाविक परत वारीसाठी संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी करतात.

नरसी येथे जवळपास 4 ते 5 लाख भाविक जमले आहेत. त्यामुळे पोलीस विभागाच्या वतीने अधीक्षक योगेश कुमार यांनी सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात केला आहे. या ठिकाणी आज सकाळी 6 वाजता मंदिर जिर्णोध्दार समिती अध्यक्ष रामेश्वर शिंदे यांनी महाआरती करून नामदेव महाराजांचे दर्शन घेतले.

Intro:हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे आज सकाळी पाच वाजल्यापासून परतवारी निमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे
संत नामदेव महाराजांचे जन्मगाव असलेल्या नरसी नामदेव येथे आज 28 जुलैला परतवारी एकादशी असल्याने शेकडो दिंड्या संत नामदेव महाराजांच्या दर्शनाकरिता आलेल्या आहेत
भाविक आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दर्शनाकरता गेले होते तेच भाविक आज संत नामदेव महाराजांच्या दर्शनाकरता प्रामुख्याने आलेले आहेत Body:आषाढी वारी निमित्त अनेक संतमंडळी विठ्ठलाच्या दर्शनाला जात होते यामध्ये विठ्ठलाचे लाडके भक्त म्हणून संत नामदेव महाराज हे सुद्धा जात होते त्यामुळे ज्यांनी पंढरपूरची वारी केली असे भाविक परत वारीसाठी संत नामदेव महाराजांच्या दर्शनाकरीता नरसी नामदेव येथे येत असतात.
Conclusion:जवळपास चार ते पाच लाख भाविकांचे संध्याकाळपर्यंत दर्शन होण्याची अंदाज आहे
पोलीस विभागाच्या वतीने पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात केला आहे सकाळी सहा वाजता मंदिर जिर्णोध्दार समिती अध्यक्ष रामेश्वर शिंदे
यांनी महाआरती करून दर्शन घेतले.
उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांचे हस्ते महापुजा पारपडली यावेळी आदी विश्वस्त उपस्थित होते.

बाईट : आ.तान्हाजी मुटकुळे हिंगोली
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.