ETV Bharat / entertainment

पाहा, कमल हासनचे सँड अ‍ॅनिमेशन, वाळू शिल्पकाराने दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा - KAMAL HAASAN SAND ANIMATION

कमल हासनच्या 70 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं वाळू शिल्पकार मानस कुमार साहूने त्यांचे सुंदर सँड अ‍ॅनिमेशन बनवले आहे. हे चित्र बनताना पाहणं एक मनोरंजक अनुभव आहे.

Kamal Haasan's 70th Birthday
कमल हासनचे सँड अ‍ॅनिमेशन (Etv BHarat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 7, 2024, 4:52 PM IST

पुरी - साऊथचा सुपरस्टार कमल हासनचा आज ७० वा वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्तानं आंतरराष्ट्रीय वाळू शिल्पकार मानस कुमार साहू यांनी सुपरस्टार कमल हसन यांना सँड अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी साहू यांनी 1 मिनिट 36 सेकंदाचा सँड अ‍ॅनिमेशन व्हिडिओ बनवला आहहे. यामध्ये कमल हासन यांचे सुंदर चित्र रेखाटलं जाताना आपण पाहू शकतो. 'कमल हासन यांना 70 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,' असा मजकूरही यामध्ये त्यांनी या माध्यमातून चितारला आहे. हा सँड अ‍ॅनिमेशन व्हिडिओ बनवण्यासाठी मानस साहूला 2 तास लागले आहेत. सँड अ‍ॅनिमेशनच्या पद्धतीनं चित्र तयार होत असताना पाहणं खूप मनोरंजक आहे.

कमल हासनचे सँड अ‍ॅनिमेशन (Etv BHarat)

कमल हासन यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत 200 हून अधिक चित्रपट केले आहेत आणि आजही ते सक्रिय आहेत. कमल यांनी वयाच्या 6 व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. गेल्या सहा दशकात सातत्यानं त्यांनी आपल्या अभिनय क्षमतेचा प्रत्यय प्रेक्षकांना दिला आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या चित्रपटासाठी सर्वाधिक ऑस्कर नामांकनांचा विक्रम कमल हासन यांच्या नावावर आहे. आतापर्यंत त्यांचे 7 चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आले आहेत. इतकेच नाही तर कमल हासन यांनी हिंदी आणि साऊथ चित्रपटांसाठी १९ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही जिंकला आहे. त्यांची कारकीर्द 6 दशकांहून अधिक काळ पसरली असून अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. एका चित्रपटासाठी 1 कोटी रुपये आकारणारे आणि सर्वाधिक कमाई करणारा पहिला भारतीय अभिनेता अशीही त्यांची वेगळी ओळख आहे. याशिवाय त्यांना दोन वेळा पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कला उद्योगातील योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. कमल हासन आगामी काळात 'इंडियन 3' आणि 'ठग लाइफ'मध्ये दिसणार आहेत.

कमल हासन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'ठग लाईफ' चित्रपटाचा टिझर आजच लॉन्च करण्यात आला आहे. मणिरत्नम यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट पुढील वर्षी 5 जूनला रिलीज होईल. एका अनोख्या अवतारात कमल हासन या चित्रपटात दिसत आहेत. 'नायकन' या चित्रपटानंतर तब्बल 35 वर्षांनी कमल हासन आणि मणिरत्नम एकत्र काम करत आहेत. आज कमलच्या वाढदिवसानिमित्त या खास टिझरच अनावरण करण्यात आलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.