ETV Bharat / entertainment

मल्टी स्टारर ‘मु पो बोंबिलवाडी’ चं नवं पोस्टर झालं अनावरीत!

दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा नवा मल्टी स्टारर ‘मु.पो. बोंबिलवाडी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं नवं पोस्टर पाहण्यासारखं आहे.

Movie poster
‘मु.पो. बोंबिलवाडी’ चं नवं पोस्टर झाले अनावरीत (Movie poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 3 hours ago

मुंबई - मल्टी स्टारर ‘मु.पो. बोंबिलवाडी’ चं नवं पोस्टर प्रकाशित करण्यात आले असून प्रशांत दामले हिटलरच्या भूमिकेत तर चर्चिलच्या भूमिकेत आनंद इंगळे दिसत आहेत. ‘हरीशचंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, चि. व चि. सौ. कां, ‘वाळवी’ आणि नुकताच प्रदर्शित होऊन गेलेला 'नाच ग घुमा' सारखे एकापेक्षा एक सरस चित्रपट देणारे दिग्दर्शक परेश मोकाशी नेहमीच आशयघन विषय नर्मविनोदी ट्रीटमेंट देऊन मनोरंजक बनवतात. त्यातील तब्बल तीन चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आता त्यांचा नवा चित्रपट येऊ घातलाय ज्याचे नाव आहे ‘मु.पो. बोंबिलवाडी १९४२ एका बॉम्बची बोंब’. नुकतंच त्याचं पोस्टर अनावरीत करण्यात आलं.

मधुगंधा कुलकर्णी, विवेक फिल्म्स आणि मयसभा करमणूक मंडळी यांच्या सह-निर्मितीत बनणाऱ्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. हा चित्रपट पूर्वीच्या, त्याच नावाच्या, लोकप्रिय नाटकावर आधारित असून, कथेत काही बदल करून चित्रपट सादर करण्यात आला आहे. पोस्टरमधून ही एक स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिशकालीन कथा असणार असल्याची कल्पना येते. नाटकाप्रमाणेच त्याचे कथानक एका बॉम्बस्फोटाच्या घटनेवर आधारित असून पोस्टरमधून विविध कलाकारांची छायाचित्रे समोर आली आहेत.

New poster of Mukkam Post Bombilwadi
‘मु.पो. बोंबिलवाडी’ चं नवं पोस्टर झाले अनावरीत (Movie poster)

या मल्टी स्टारर चित्रपटात प्रशांत दामले, आनंद इंगळे, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, सुनील अभ्यंकर, मनमित पेम, रितिका श्रोत्री, प्रणव रावराणे, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर, दीप्ती लेले आणि राजेश मापुस्कर यांसारखे लोकप्रिय कलाकार आहेत. चित्रपटाबद्दल बोलताना मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “प्रशांत दामले यांनी हिटलरची भूमिका साकारायला मान्य केल्याने चित्रपटाचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्यांच्या सोबत इतर अनुभवी कलाकारही यात असल्याने हा चित्रपट एक मजेशीर आणि हसवणारा अनुभव देईल.”

‘मु.पो. बोंबिलवाडी १९४२ एका बॉम्बची बोंब’ हा चित्रपट नववर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.