ETV Bharat / state

धक्कादायक..! पीक कर्ज घेण्यासाठी आला मृत शेतकरी

पीक कर्ज देण्यासाठी बँका शेतकऱ्यांना अनेक चकरा मारायला लावतात. तरीही गरजू शेतकऱ्यांना कर्ज मिळेलच यांची शाश्वती नसते. पंधरा वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या नावाने पीक कर्ज दिल्याचा धक्कादायक प्रकार वसमत येथील युनियन बँकेत उघडकीस आला.

Bank
बँक
author img

By

Published : Jan 10, 2021, 9:34 AM IST

हिंगोली - दिवसेंदिवस पिक कर्ज देण्यासाठी बँका कानकूस करताना दिसत आहेत. ज्याला खरोखरच पीक कर्ज पाहिजे त्याला वेगवेगळ्या प्रकारची कारणे सांगून, पीक कर्जपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजूनही अनेक शेतकरी पीक कर्ज मिळवण्यासाठी बँकेत खेटे घेत आहेत. पंधरा वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या नावाने पीक कर्ज दिल्याचा धक्कादायक प्रकार वसमत येथील युनियन बँकेत उघडकीस आला. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण तेरा जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कनीराम नामदेवराव राठोड(रा. चोंढी) यांचा ४ जून २०१५ रोजी मृत्यू झालेला आहे. मात्र, राठोड यांच्या नावे असलेल्या गट क्रमांक 135 मधील 1 हेक्टर 68 आर, या शेत जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून, मृत राठोड यांच्या कुटुंबाला कोणतीही कल्पना न देता एक लाख पाच हजार रुपयांचे कर्ज घेतले गेले आहे. ही बाब माहिती अधिकारी कार्यकर्ता नदाफ एम बशीर यांनी केलेल्या अर्जात उघड झाली आहे.

अनेक वेळा दिलेल्या तक्रारीकडे केले जात होते दुर्लक्ष -

नदाफ एम बशीर यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी अनेक वेळा तक्रार केली होती. मात्र, त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे नदाफ यांनी परत पुराव्यासह तक्रार दाखल केली. या प्रकरणात मृत व्यक्तीच्या नावे बँकेत खाते उघडल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे बँकेच्या सर्व नियमांची पूर्तता करून खाते उघडले गेले आहे.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल -

युनियन बँकेचे व्यवस्थापक, कर्ज वितरण शाखा व्यवस्थापन, खाते तपासणी अधिकारी, रोखपाल, कॅशियर, खाते उघडण्यासंदर्भात साक्षीदार म्हणून ओळखपत्र दिलेली व्यक्ती, कर्ज मंजुरीसाठी सर्च रिपोर्ट देण्यासाठी नियुक्त केलेले विधिज्ञ वकील, राजकुमार स्वामी, अधिकृत मुद्रांक विक्रेता, दुय्यम निबंधक अधिकारी उखडे, कार्यालय, तलाठी वाघिले, कुरुंदा महसूल मंडळ अधिकारी अंभोरे, बनावट आधारकार्ड बनवून देणारी व्यक्ती, संस्था बनावट पॅनकार्ड बनवून देणारी व्यक्ती व संस्था अशा 13 जणांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

कर्जाचा तपास होणे गरजेचे -

एखाद्या लाभार्थ्याला कर्ज देण्यापूर्वी बँकेकडून त्याच्या कागदपत्राची फार बारकाईने तपासणी केली जाते. एवढेच नव्हे तर ही कागदपत्रे तपासणीसाठी घेऊन येताना लाभार्थ्यांच्या नाकीनऊ देखील आणले जातात. तर दुसरीकडे मात्र मृत व्यक्तीच्या नावावर कर्ज उचलल्यामुळे बँक व्यवस्थापनावरील विश्वासार्हता आता कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय अजून असे प्रकार किती असावेत हे संपूर्ण तपासामध्ये उघड होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.