ETV Bharat / state

औंढा नागनाथ मंदिरात शिवसेनेच्या आमदाराकडून कोरोनाच्या नियमांना तिलांजली - औंढा नागनाथ मंदिर खुले

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मंदिरातील संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. मात्र, पहिल्याच दिवशी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे आपल्या कार्यकर्त्यांसह मंदिरांमध्ये नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी गेले असता नियमांचा भंग केला. त्यांच्यासह सोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्याही तोंडाला मास्क नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.

aundha nagnath
औंढा नागनाथ
author img

By

Published : Nov 16, 2020, 12:37 PM IST

हिंगोली - राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे आजपासून उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीर सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात येत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील १२ ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिरही भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनीदेखील दर्शन घेतले. मात्र, या मंदिरात पहिल्याच दिवशी आमदारांनी स्वतः राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांना तिलांजली दिल्याचे दिसून आले. सुरक्षित अंतराचा फज्जा उडवला गेला. तसेच आमदारांसह सर्वजण विनामास्क मंदिरात प्रवेश घेत होते. त्यामुळे सत्ताधारी आमदारच विनामास्क दर्शन घेत असतील तर इतरांचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

हिंगोलीत औंढा नागनाथ मंदिरात शिवसेनेच्या आमदाराकडून कोरोनाच्या नियमांना तिलांजली
हेही वाचा -विठ्ठल मंदिरात मुखदर्शन सुरुवात; चेन्नईतील भक्तांना मिळाला सर्वप्रथम दर्शनाचा मान

पहिल्याच दिवशी सत्ताधारी आमदारांकडून नियमाचा भंग -
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मंदिरातील संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. मंदिर उघडण्यापूर्वी मंदिरात भाविकांना प्रवेश देण्यासाठी नियमदेखील घालून देण्यात आलेले आहेत. मात्र, पहिल्याच दिवशी कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे आपल्या कार्यकर्त्यांसह मंदिरांमध्ये नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी गेले असता नियमांचा भंग केला. त्यांच्यासह सोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्याही तोंडाला मास्क नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सोशल डिस्टंसिंगचे पालन होण्यासाठी मंदिर प्रशासनाचे प्रयत्न -

याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करूनच नागनाथाचे दर्शन घ्यावे लागणार आहे. त्यासाठी तशी यंत्रणा सज्ज केली आहे. त्याचबरोबर सूचना फलक देखील लावण्यात आले आहेत. मात्र, या सूचनांचे पहिल्या दिवशी या ठिकाणी पालन होत नसेल तर भविष्यात भाविक कितपत राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करतील हे पाहावे लागणार आहे.

पुजारीही विनामास्क -
नागनाथाच्या मंदिरातील पुजारीदेखील विनामास्क पूजा करत होते. त्यामुळे एकंदरीत आज पहिल्याच दिवशी मंदिरात नियंमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. वास्तविक पूजारी आणि मंदिर प्रशासनाकडे नियम अंमलबजावणीचे अधिकार आहेत. मात्र तेच नियमांची पायमल्ली करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुढील काळात कोरोनाचे संकट गडद झाले तर त्याला असेच बेजाबाबदार लोक कारणीभूत ठरणार असे दिसते.

हेही वाचा - मुंबईतील प्रसिध्द सिद्धिविनायक मंदिर खुले; भाविकांची गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.