हिंगोली - दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत चालली आहे. ही संख्या वाढण्यासाठी निष्काळजीपणा चांगलाच भोवणार आहे. आरोग्य विभाग व प्रशासन तर तुमच्या पाठीशी आहेच. मात्र, आता जनतेनेही आपली स्वतःची काळजी घेणे नितांत गरजेचे आहे, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जनतेला केले आहे. ते कोरोना रुग्णांना दिलेल्या भेटीदरम्यान ते त्यांनी हे आवाहन होते.
आरोग्य यंत्रणा व प्रशासन खूप गतीने काम करीत आहे. आता मात्र जनतेने देखील भान ठेवणे गरजेचे आहे. जनतेने काळजी घेतली तर नक्कीच आपल्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत मिळेल. तर आता भविष्यात लॉकडाऊन लावायचा की नाही, हे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशीच निर्णय घेतील असे आयुक्त केंद्रेकर यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी न चुकता लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याच्या दिल्या सूचना
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन आयुक्त केंद्रेकर यांनी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कोरोना संशयित्यांच्या चाचण्या वाढविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. तसेच पोलीस विभागाला देखील वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झालेल्या सूचनांचे पालन करून कोरोना काळात कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आता येथून पुढे शहरात पोलिस प्रशासन देखील अजून चोख कर्तव्य बजावणार आहे.
पाण्यासाठी होणारी प्राण्यांची भटकंती थांबवण्याच्याही सूचना
सध्या दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे जंगलातील पाणवठे कोरडे पडण्याची शक्यता असून, वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत असेल त्यामुळे, प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, सोबतच रस्त्याच्या कडेला देखील जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून ठेवावे. तर सर्व यंत्रणांनी वृक्ष लावगडीवर भर देऊन प्रत्येक कार्यालय प्रामुखाने आपाआपले कार्यालय स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. अन जिल्हा परिषदेने 'सुंदर माझे कार्यालय सुंदर माझे गाव' या अभियानाकडे लक्ष देण्याच्या सूचना आयुक्त केंद्रेकर यांनी दिल्या. यावेळी शहरातील रामलीला मैदानाची पाहणी करताना विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक राकेश कला सागर, सीईओ राधाबिनोद शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, नगरपरिषद चे नगर अभियंता रत्नाकर अडसरे, बाळू बांगर यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.