ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष: लाॅकडाऊनमुळे लोहाराचा 'घन' थांबला... पाणी पिऊन काढताहेत रात्र - hongoli news

पूर्वी व्यवसायातून उदरनिर्वाह भागेल येवढी रक्कम मिळायची. मात्र, कोरोनामुळे अर्थचक्र बिघडले असल्याने खायचे काय हा त्याच्यासमोर यक्ष प्रश्न आहे. परिसरातील काही नागरिक त्यांना खायला आणून देतात. तेवढाच काय तो त्यांना आधार आहे. ते ही कधी मिळतो तर कधी नाही. त्यामुळे उपाशीच झोपावे लागत असल्याची अवस्था सोळंके कुटुंबाची आहे.

corona-effect-on-solanke-family-in-hingoli

author img

By

Published : May 5, 2020, 1:37 PM IST

Updated : May 5, 2020, 5:41 PM IST

हिंगोली- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लाॅकडाऊन लागू करण्यात आला. या लाॅकडाऊनमुळे सर्वांचेच अर्थचक्र कोलमडले आहे. हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे हाल होत आहेत. अशाच हिंगोलीतील एका लोहार कुटुंबाला लॉकडाऊनचा प्रचंड मोठा फटका बसला आहे. लाॅकडाऊनमुळे खाण्याचे वांदे झाल्याने पाणी पिऊन झोपावे लागत आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला विशेष आढावा.

हेही वाचा- MAHA CORONA : मुंबईमध्ये नवीन 510 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 9123

जुनमध्ये खरिपाची पेरणी होते. त्या पार्श्वभूमीवर शेतीकामाला वेग आला आहे. शेतीकामासाठी मोठ्या प्रमाणात लोखंडी अवजारांचा उपयोग होतो. ती लोहारांकडून बनवून घेतली जातात. त्यामुळे सध्या लोहारांच्या व्यवसायाचा कालावधी सुरू होता. शेतकरी लोहारांचा शोध घेत लोखंडी अवजारे बनवून घेत असतात. मात्र, यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅकडाऊन लावण्यात आला. संचारबंदीही आहे. शेतीच्या कामाला परवानगी आहे. मात्र, घराबाहेर पडले की, पोलीस मार देताता या भीतीने शेतकरी लोहारांच्या दुकानाकडे फिरकताना दिसत नाही. त्यामुळे लोहाराचा 'घना' यावेळी थांबला आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोहारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

हिंगोली येथे गेल्या 25 वर्षांपासून रंगनाथ लिंबाजी सोळंके हे लोहार कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्या आधाराने इतरही लोहार कुटुंब येथे स्थाईक झाले आहेत. जवळपास 7 लोहार कुटुंब रस्त्याच्या कडेला तंबू थाटून राहत आहेत. पूर्वी रामलीला मैदान हे मोकळे असल्याने, त्या ठिकाणी तालुक्यातील सर्वच वाहने उभी राहत असत. मात्र, रामलीला मैदानाला आता महसुल विभागाच्या वतीने संरक्षण भिंत बांधण्यात आली. त्यामुळे येथील सर्वच नियोजन कोलमडले आहे. त्याच्या दुकानाभोवती वाहने उभे राहायला लागली. त्यामुळे रस्त्यावरुन दुकान दिसत नसल्याने व्यवसायावर फटका बसला.

त्यातच कोरोना महामारी आली त्यामुळे देशभर लाॅकडाऊन लागले. त्यामुळे व्यवसाय बंद पडला आहे. कसे-बसे लोहाराची दुकाने शोधत येणारे शेतकरी आता लॉकडाऊनमुळे येत नाहीत. सुरुवातीपासूनच रस्यावर जीवन जगल्यामुळे त्याच्याकडे कोणतीही आवश्यक ती कागदपत्र नाहीत. त्यामुळे सरकारी सुविधाही त्यांना मिळत नाहीत. आलेल्या दिवस ढकलण्याचे काम सध्या सोळंके कुटुंब करीत असल्याचे ते पोटतीडकीने सांगतात.

पूर्वी व्यवसायातून उदरनिर्वाह भागेल येवढी रक्कम मिळायची. मात्र, कोरोनामुळे अर्थचक्र बिघडले असल्याने खायचे काय हा त्याच्यासमोर यक्ष प्रश्न आहे. परिसरातील काही नागरिक त्यांना खायला आणून देतात. तेवढाच काय तो त्यांना आधार आहे. ते ही कधी मिळतो तर कधी नाही. त्यामुळे उपाशीच झोपावे लागत असल्याची अवस्था सोळंके कुटुंबाची आहे. त्यामुळे या कुटुंबाला शासनाने मदत करण्याची गरज आहे.

Last Updated : May 5, 2020, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.