ETV Bharat / state

राहुल गांधीं धक्काबुक्कीचे प्रकरणाचे हिंगोलीत पडसाद, काँग्रेसने केला निषेध - हिंगोली काँग्रेस न्युज

काँग्रेस नेते राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवुन धक्काबुक्की केली. या घटनेचे हिंगोली जिल्ह्यात पडसाद उमटले असून, ओंढा नागनाथ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून पोलीस प्रशासन व भाजपचा निषेध केला.

राहुल गांधी धक्काबुकी प्रकरणाचा हिंगोलीत काँग्रेसने केला निषेध

author img

By

Published : Oct 1, 2020, 8:41 PM IST

हिंगोली- हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवुन धक्काबुक्की केली. या घटनेचे हिंगोली जिल्ह्यात पडसाद उमटले असून, ओंढा नागनाथ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून पोलिस प्रशासन व भाजपचा निषेध केला.

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरण चांगलेच गाजले आहे. या प्रकरणाने महिला अजूनही असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. यापार्श्वभूमीवर पीडितेची भेट घेण्यासाठी रवाना झालेले काँगेस नेते राहुल- प्रियंका गांधी यांची वाहने उत्तरप्रदेश पोलिसांनी अडवली.

त्यामुळे ते आपल्या कार्यकर्त्यांसह यमुना एक्स्प्रेसवरून पायी चालत जात होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, एवढेच नव्हे तरयावेळी राहुल गांधी त्यांना धक्काबुक्कीही केली, तसेच एवढ्यावरच न थांबता त्यांनी राहुल गांधीना खाली पाडले. या धक्कादायक प्रकारचे सर्वत्र व्हिडीओ व फोटो व्हायरल झाले असल्याने, संपूर्ण राज्यातून या घटनेचा निषेध केला जात आहे.

ओंढा नागनाथ येथेही आज काँग्रेसने संताप व्यक्त करत घटनेचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून, भाजपविरुद्ध घोषणाबाजी केली तसेच उत्तरप्रदेश पोलिसांचा निषेध केला. तर काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी देखील या घटनेचा निषेध करीत ट्विटर वरून "इंदिरा का पोता है, राजीव का बेटा है' नही डरेगा नही डरेगा असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.