ETV Bharat / state

'मातृभूमी रिअलटेक डेव्हलपमेंट कंपनी'च्या पाच संचालकांविरुद्ध हिंगोलीत गुन्हा दाखल - मातृभूमी रिअलटेक डेव्हलपमेंट कंपनी न्यूज

जिल्ह्यात दिवसेंदिवस फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. ठाण्यातील एका कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

fraud
फसवणूक
author img

By

Published : Dec 12, 2020, 1:13 PM IST

हिंगोली - ठाणे जिल्ह्यातील 'मातृभूमी रिअलटेक डेव्हलपमेंट कंपनी' हिंगोलीतील ठेवीदारांना व विमा ग्राहकांना मुदत संपलेली असताना देखील रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. त्यामुळे संतापलेल्या ग्राहकांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात कंपनीच्या पाच संचालकाविरुद्ध 19 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हिंगोलीतील कार्यालयच केले बंद -

प्रदीप गर्ग (रा. शांती गार्डन सेक्टर, मीरा रोड पूर्व, ठाणे), संजय हेमंत बिश्वास (रा. हॅपी होम पूनम सागर, कॉम्प्लेक्स मीरा रोड, ठाणे), मिलिंद अनंत जाधव (रा. साकेत अपार्टमेंट, पचपाखाडी, ठाणे), निशांत उर्फ मोनू गुप्ता (रा. ठाणे), विनोद पटेल (रा. नानापोंडा लुहार, जि. बलसाड गुजरात) अशी संचालक मंडळाची नावे आहेत. या सर्वांनी गुंतवणूक व ग्राहक वाढवण्यासाठी सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, सेल्स ऑफिसर, डेव्हलपमेंट ऑफिसर अशी पदे दिलेली आहेत. कंपनीच्या नियमानुसार या सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीसाठी गुंतवणूक व विमा ग्राहक वाढवले. कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या नियमानुसार तक्रारदारांनी ठेवी ठेवल्या. मात्र, 2017 नंतर विमा कंपनीने विमा रक्कम व ठेवीची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केली. हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी संचालकाशी संपर्क साधला. संचालक मंडळाने लवकरच रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले. मात्र, कंपनीने हिंगोली येथील कार्यालयात बंद करून टाकल्याने सर्व ठेवीदारांमध्ये एकच गोंधळ उडाला.

ठेवीदारांनी गाठले पोलीस ठाणे -

अनेकदा मागणी करूनही रक्कम मिळाली नसल्याने ठेवीदार गोंधळून गेले होते. काही दिवसांनी कार्यालयातच बंद झाल्याचे आढळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हिंगोली शहरातील गणेश निकम यांनी थेट हिंगोली शहर पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली. यामध्ये त्यांची 19 लाख 14 हजार एवढी रक्कम अडकल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

18 हजारांच्यावर ठेवीदार -

या कंपनीमध्ये अठरा हजारांपेक्षा जास्त ग्राहकांनी विमा काढलेला आहे. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून, रक्कम 10 कोटी रुपयांपर्यंत आहे. यापूर्वी याच कंपनी विरुद्ध चिपळूण, नाशिक आणि गुजरात येथे गुन्हे दाखल झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.

पथकाला गुजरात येथे जाण्याच्या सूचना -

या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गुजरात येथे जाण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी आर्थिक गुन्हे शाखेला दिल्या आहेत. त्यानुसार एक पथक हे गुजरात येथे जाण्याच्या तयारीत आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.