ETV Bharat / state

हिंगोलीमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, 157 जणांवर गुन्हे दाखल तर वसमतमध्ये शनिवारी बंदची हाक - cab protest in hingoli

हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासूनच तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते. आंदोलकांनी बंदची हाक पुकारण्यात आल्याने, पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात सर्वत्र बंदोबस्त ठेवला होता. मात्र, कळमनुरी येथे आगारातील चार ठिकाणी बसेस फोडल्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. मात्र आता परिस्थिती आटोक्यात आली आहे.

caa-protest-in-hingoli
हिंगोलीमध्ये आंदोलनाला हिंसक वळण
author img

By

Published : Dec 21, 2019, 12:55 PM IST

Updated : Dec 21, 2019, 2:18 PM IST

हिंगोली - संपूर्ण राज्यात नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. मात्र, कळमनुरी येथे करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यात काही आंदोलकांनी चार बस व अग्निशमन दलाची गाडी फोडली आहे. पोलिसांवरही दगडफेक केल्यामुळे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. तर हिंगोली येथे एका मानव विकास विभागाची बस फोडण्यात आली होती. त्यामुळे कळमनुरी पोलीस ठाण्यात 150 तर हिंगोली शहर पोलिसात 7 जण अशा एकूण 157 जणांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यावर खासदार हेमंत पाटील यांनी आंदोलकांना शांततेचे अवाहन केले असले तरी वसमत येथे आंदोलकांनी बंदची हाक दिली आहे.

हिंगोलीमध्ये आंदोलनाला हिंसक वळण

हेही वाचा - भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासूनच तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते. आंदोलकांनी बंदची हाक पुकारण्यात आल्याने, पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात सर्वत्र बंदोबस्त ठेवला होता. मात्र, कळमनुरी येथे आगारातील चार ठिकाणी बसेस फोडल्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यानंतर पोलिसांनी 11 अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडल्या तरीही काही आंदोलक दगड फेक करत होते. कळमनुरी येथील परिस्थिती गंभीर असल्याने, सायंकाळी उशिरापर्यंत बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे ताटकळत बसलेल्या काही प्रवाशांना पोलीस वाहनाने हिंगोली मार्गे सोडण्याचा प्रयत्न केला जात होता. तर नागरिकांच्या वतीने खासदार हेमंत पाटील यांच्या काही कार्यकर्त्यांनी प्रवाशांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली. तर स्वतः पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर हे कळमनुरी येथे रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. आता मात्र परिस्थिती आटोक्यात आली आहे.

तोड-फोड प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात 150 जनावर गुन्हे दाखल केले असून, 20 जणांना ताब्यात घेतलंय तर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात 7 जनांवर गुन्हे दाखल केले असून, 4 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. तर फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने आरोपीची धरपकड सुरू असल्याने, जिल्ह्यात भयभीत वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास खा. हेमंत पाटील यांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांची भेट घेऊन आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा - "भारताचे नागरिकत्व सिद्ध करण्यात 'प्रॉब्लेम' काय ?"

Intro:

हिंगोली- संपूर्ण राज्यात नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलन केले होते, त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात ही आंदोलन केलंय. मात्र कळमनुरी येथे करण्यात आलेल्या दंगलीत चार बसेस अन एक अग्निशमन दलाची गाडी फोडत पोलिसांवर ही दगड फेक केली या दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. तर हिंगोली येथे एक मानव विकास ची बस फोडण्यात आली होती. त्यामुळे कळमनुरी पोलीस ठाण्यात 150 तर हिंगोली शहर पोलीसात 7 जण असे एकूण 157 जनावर गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळालीय.

Body:हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी सकाळ पासूनच तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते. बंद ची हाक पुकारण्यात आल्याने, पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात सर्वत्र वाढीव बंदोबस्त ठेवला होता. मात्र कळमनुरी येथे आगारातील चार ठिकाणी बसेस फोडल्या मुळे आंदोलनाला हिंसक वळण आले होते. एवढेच नव्हे तर कळमनुरी येथे अग्निशमन दलाच्या गाडीचे ही काचा फोडल्या अन कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही दगड फेक केली. 11 अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडल्या गेल्या. तरी ही आंदोलक दगड फेक करीत होते. तर हिंगोली येथे ही मानव विकास च्या बस वर दगड फेक करण्यात आल्याने एक प्रवाशी महिला गंभीर जखमी झाली होती. एकंदरीतच जिल्ह्यात वातावरण चांगलेच चिंताग्रस्त होते. मात्र कळमनुरी येथील परिस्थिती गंभीर असल्याने, सायंकाळी उशिरापर्यंत बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे ताटकळत बसलेल्या काही प्रवाशाना पोलीस वाहनाने हिंगोली मार्गे सोडण्याचा प्रयत्न केला जात होता. तर नागरिकांच्या वतीने अन खा. हेमंत पाटील यांच्या काही कार्यकर्त्यांनी प्रवाशांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली. तर स्वतः पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे , उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर हे कळमनुरी येथे रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. तोड फोड प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात Conclusion:150 जनावर गुन्हे दाखल केले असून, 20 जणांना ताब्यात घेतलंय तर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात 7 जनावर गुन्हे दाखल केले असून, 4 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिलीय. तर फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने आरोपीची धरपकड सुरू असल्याने, जिल्ह्यात भयभीत वातावरण निर्माण झालेय. तर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास खा. हेमंत पाटील यांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांची भेट घेऊन आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.
Last Updated : Dec 21, 2019, 2:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.