ETV Bharat / state

शेतीच्या वादातून चुलत भावानेच भावाला संपवले; सात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा

गणेश रामकिसन डोरले, अंबादास बाबुश्या घोंगडे, विठ्ठल नामदेव घोंगडे, ज्ञानेश्वर किसन बोरगड, मारोती विठ्ठल डोरले, रामकिशन पंडिता डोरले, नामदेव किसन डोरले असे आरोपीची नावे आहेत.

author img

By

Published : May 22, 2019, 4:37 PM IST

शेतीच्या वादातून चुलत भावानेच भावाला संपवले; सात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा

हिंगोली - जिल्ह्यातील राहोली बु. येथे जुन्या शेतीच्या वादातून एकाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. शंकर लक्ष्मण डोरले (३५) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मृताच्या वडीलाच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही खुनाची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

गणेश रामकिसन डोरले, अंबादास बाबुश्या घोंगडे, विठ्ठल नामदेव घोंगडे, ज्ञानेश्वर किसन बोरगड, मारोती विठ्ठल डोरले, रामकिशन पंडिता डोरले, नामदेव किसन डोरले असे आरोपीची नावे आहेत. मृत शंकर आणि आरोपीमध्ये शेताचा धुरा करण्याच्या कारणावरून प्रथम शाब्दिक वाद झाला. शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला की यात आरोपीने थेट शंकरयांच्या डोक्यात गंभीर वार केले. यात शंकर हे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. जखमी शंकर यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांने तपासून मृत घोषित केले.

या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. फरार आरोपींचा ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत. दोन दिवसांपूर्वीच वसमत तालुक्यातील मळवटा फाट्यावर उधारी मागण्याच्या कारणावरून एका व्यापाऱ्याचा खून झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर लगेच ही खुनाची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शंकर डोरले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवला आहे. अधिक तपास पोलीस ए. डी. सुडके हे करत आहेत.

Intro:हिंगोली जिल्ह्यातील राहोली बु येथे जुन्या शेतीच्या वादातून एकाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. शंकर लक्ष्मण डोंगरे(३५) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी मयताच्या वडीलाच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही खुनाची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Body:गणेश रामकीसन डोरले, अंबादास बाबुश्या घोंगडे, विठल नामदेव घोंगडे, न्यानेश्वर किसन बोरगड, मारोती विठल डोरले, रामकिशन पंडिता डोरले, नामदेव किशन डोरले असे आरोपीची नावे आहेत. मयत आणि आरोपी मध्ये शेताचा धुरा करण्याच्या कारणावरून प्रथम शाब्दिक वाद झाला. शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला की यात आरोपीने थेट शंकर यांच्या डोक्यात गंभीर वार केला. यात शंकर हे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. जखमी शंकर ला जिल्हासामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टराने तपासून मयत घोषित केले.

Conclusion:या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. फरार आरोपीचा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत. दोन दिवसांपूर्वीच वसमत तालुक्यातील मळवटा फाट्यावर उधारी मागण्याच्या कारणावरून एका व्यापाऱ्याचा खून झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेची शाही पुसते न पुसते तोच ही खुनाची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शंकर डोरले यांचा मृतदेह शेवविच्छेदनासाठी जिल्हासामान्य रुग्णालयात हलविला आहे. तपास पोनि ए. डी. सुडके हे करीत आहेत.

मयताचा फोटो मिळताच मेल करून फोन करतो
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.