हिंगोली- येथील सेनगाव तालुक्यातील सालेगाव शिवारात येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या मच्छिमाराचा विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाला. काल (सोमवारी) दुपारीच्या सुमारास ही घडली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा- सुडाचे राजकारण करु नये, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
सोपान रंगनाथ दुबलकर (वय २२ रा. डोंगरगाव) असे मृत मच्छिमाराचे नाव आहे. सोपानचा मच्छिमारीचा व्यवसाय आहे. त्यावरच त्याचे घर चालत होते. सोपान नेहमी प्रमाणे सालेगाव शिवारातील येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासे पकडण्यासाठी गेला होता. दरम्यान, पाण्यामध्ये जाळे टाकताना त्याचा विद्युत तारेचा स्पर्श झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती सेनगाव पोलीस ठाण्याला मिळतात घटनास्थळी पोलीस निरिक्षक बाबुराव जाधव, पोलीस हवालदार भीमराव चिंतारे यांनी धाव घेतली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसापासून विद्युत वितरण कंपनीचा कारभार गलथान असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे सेनगाव तालुक्यात सर्वात जास्त शॉक लागून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पाणलोट क्षेत्रात देखील अनेक दिवसापासून विद्युत तारा लोंबकळत होत्या. मात्र, त्याच्या दुरुस्तीकडे विद्युत वितरण कंपनीने साफ दुर्लक्ष केले आहे.