ETV Bharat / state

आसोलवाडीत पोलीस बंदोबस्तात केल्या बर्ड फ्लू झालेल्या कोंबड्या नष्ट

आसोलवाडीत पोलीस बंदोबस्तात बर्ड फ्लू झालेल्या कोंबड्या नष्ट करण्यात आल्या.

बर्ड फ्लू झालेल्या कोंबड्या केल्या नष्ट
बर्ड फ्लू झालेल्या कोंबड्या केल्या नष्ट
author img

By

Published : Feb 20, 2021, 10:15 PM IST

Updated : Feb 21, 2021, 9:46 AM IST

हिंगोली - पोलीस बंदोबस्तात बर्ड फ्लू झालेल्या कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. जेसीबीच्या साह्याने खड्डे खोदून कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. कोरोना नंतर आलेल्या बर्ड फ्लूने कुक्कुटपालन व्यावसायिकांचे जीवन अडचणीत आले आहे. या कोंबड्यावर कुटुंब चालत होतं. आता मात्र नेमकं काय खाऊन जीवन जगावे, अशी खंत या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

बर्ड फ्लू झालेल्या कोंबड्या केल्या नष्ट
लक्ष्मण गुहाडे (रा. आसोलवाडी ता. कळमनुरी) अस या कुक्कुटपालन व्यावसायिकाचं नाव आहे. गुहाडे यांच्या लागोपाठ दोन दिवसात 300 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती. ही बाब पशुसंवर्धन विभागाला कळताच पशुसंवर्धन विभागाने गावात धाव घेऊन मयत कोंबड्यांचे नमुने घेतले. व भोपाळ व पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाला प्राप्त होताच, अधिकारी कर्मचाऱ्यांनी असोलवाडी येथे धाव घेऊन, उर्वरित कोंबड्या ताब्यात घेतल्या. पोलीस बंदोबस्तात घेतल्या कोंबड्या ताब्यातबर्ड फ्लू झाल्याची माहिती परिसरात वाऱ्या सारखी पसरली. त्यामुळे ग्रामस्थ हे चांगलेच भयभीत झाले आहेत. कोंबड्या ताब्यात घेण्यासाठी पथक जेव्हा दाखल झाले. तेव्हा ग्रामस्थ मोठ्या संख्याने रस्त्यावर दाखल झाले होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील दाखल करण्यात आला होता. अनेकांनी कोंबड्या पकडून देण्यासाठी पथकाला सहकार्य केले. शेत शिवारात खड्डे खोदून कोंबड्या केल्या नष्टबर्ड फ्लू या आजाराने अगोदरच ग्रामस्थ हे चांगलेच भयभीत झाले होते. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने मोठ्या प्रयत्नाने ताब्यात घेतल्या. व कोंबड्या गावापासून काही अंतरावर शेत शिवारात जेसीबीच्या साह्याने खड्डा खोदून नष्ट केल्या आहेत.

हेही वाचा- दिलासा नाहीच, आज पुन्हा 6281 नवे रुग्ण; अमरावतीत मुंबईपेक्षा अधिक बाधित

Last Updated : Feb 21, 2021, 9:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.