हिंगोली -जिल्ह्यातील कयाधू नदीवर सुरू असलेल्या बंधाऱ्याला स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येणार आहेत. याबाबतचे पत्र नुकतेच संबंधित विभागाच्या सचिवांना दिले असल्याची माहिती आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली.
हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष फार कमी आहे. त्यामुळे हिंगोलीतील शेती उत्पन्नाचा आलेख खालावला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीवर पाणी साठवण्यासाठी बंधारे नाहीत. परिणामी पावसाचे पाणी वाहून जाते. पाण्याअभावी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांना आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध होत नाही. आमदार तानाजी मुटकुळे यांनी सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. तानाजी मुटकुळे यांच्या विनंतीनुसार राज्यपालांनी 15 हजार हेक्टर सिंचनाचा अनुशेष मान्य केला आहे.
हेही वाचा - अंधश्रद्धेचा कळस! पाऊस थांबविण्यासाठी बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट
हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीवरील नऊ सीएमबी आणि पाच बंधाऱ्यांचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब या बंधाऱ्यांमध्ये साठवला जाणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. या स्वयंचलित दरवाज्यामुळे 14 किलो मीटरपर्यंत पाणी नदीमध्ये भरून राहू शकते. नदीला पूर आल्यानंतर दरवाजा उघडा करुन दिला जाईल. याच नदीवर अजून पाच बंधाऱ्यांना मंजुरी मिळणार आहे. यामध्ये हिंगोली, घोटा, दृक धामणी, टाकळ गव्हाण, समगा या गावांचा समावेश आहे. निघणार आहेत.