ETV Bharat / state

हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का..! दिग्गज नेते रामराव वडकुतेंनी केला भाजपमध्ये प्रवेश - विधानसभा निवडणूक

रामराव वडकुते हे शेळी-मेंढी महामंडळाचे दोन वेळा अध्यक्ष राहिलेले आहेत. तसेच ते हिंगोली जिह्यात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मानले जातात. मात्र, त्यांनाही भाजपचा मोह आवरला नाही. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांनी भाजप प्रवेशाविषयी चर्चा केली होती. त्यावर पाटील यांनी मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन वडकुतेनां भाजपच्या गोटात घेतले.

हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का..! दिग्गज नेते रामराव अडकुतेनीं केला भाजपमध्ये प्रवेश
author img

By

Published : Oct 15, 2019, 5:57 PM IST

Updated : Oct 15, 2019, 8:18 PM IST

हिंगोली - राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रामराव वडकुते यांनी आज मुंबईत मुख्यंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. वडकुते यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला हिंगोलीत मोठ्ठा धक्का बसला आहे. मागील काही दिवसांपासून वडकुते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती. अखेर आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

रामराव वडकुते बोलताना....

रामराव वडकुते हे शेळी-मेंढी महामंडळाचे दोन वेळा अध्यक्ष राहिलेले आहेत. तसेच ते हिंगोली जिह्यात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मानले जातात. मात्र, त्यांनाही भाजपचा मोह आवरला नाही. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांनी भाजप प्रवेशाविषयी चर्चा केली होती. त्यावर पाटील यांनी मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन वडकुतेनां भाजप गोटात घेतले.

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात धनगर समाजाचे मोठ्या प्रमाणात मतदान आहे. वडकुते याच समाजाचे प्रतिनिधी असल्याने त्यांना भाजप प्रवेश देण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. वडकुतेनीं जरी भाजमध्ये प्रवेश केला असला तरी, धनगर समाजाचे नेते महादेव जानकर मात्र भाजपवर नाराज आहेत. दरम्यान, वडकुते यांच्या भाजप प्रवेशामुळे हिंगोली जिह्यात राष्ट्रावादीला मोठा धक्का बसला आहे.

Intro:
हिंगोली- राज्यातील व राष्ट्रवादीच्या निष्ठावंत पैकी एक असलेले राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रामराव वडकुते यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय त्यामुळेच हिंगोलीत राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडले आहे. वडकूते हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती आज अखेर त्यांनी प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Body:रामराव वडकुते हे शेळी-मेंढी महामंडळाचे दोन वेळा अध्यक्ष राहिलेले आहेत. तसेच त्यांच्या नावानेच हिंगोलीत राष्ट्रवादी ओळखली जायाची देखील. मात्र त्याना देखील भाजपचा मोह आवरला नाही. गेल्या काही दिवसांपासून वडकूते हे भाजपच्या संपर्कात होते. एवढेच नव्हे तर भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांनी भाजपात प्रवेश घेण्यासंदर्भात चर्चा देखील केली होती. वडकूते च्या प्रवेशाबद्दल मुख्यमंत्र्यानी हिरवी झेंडी दाखवताच वडकूते यांनी प्रवेशासाठी हालचाली वाढविल्या होत्या. अन आज त्यांच्या भाजपाच्या प्रवेशाने पूर्णत्वास ही गेल्या आहेत. वास्तविक पाहता धनगर समाजासाठी स्थापन केलेल्या अहिल्याबाई होळकर शेळी मेंढी विकास महामंडळा चे दोन वेळा अध्यक्ष देखील राहिले आहेत. तसेच त्याना राज्यमंत्री दर्जाही होता. त्याना विधानसभेवर घेण्यात आले होते. मात्र आज त्यांच्या कोलाट उडी मुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. Conclusion:मराठवाडा अन पश्चिम महाराष्ट्रात धनगर समाजाचे मोठ्या प्रमाणात मतदान आहे याच समाजाचे प्रतिनिधी असल्याने महादेव जानकर हेदेखील भाजपवर नाराज आहेत मात्र चक्क धनगर समाजाचे असलेले नेते वडकुते यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Last Updated : Oct 15, 2019, 8:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.