ETV Bharat / state

वाड्या-वस्त्यानंतर आता शहरातील नगर आणि कॉलनीतही प्रवेशबंदीचे फलक

लॉकडाऊननंतरही शहरातील नागरिक बाईक आणि कारने रस्त्यांवर फिरताना दिसत होते. मात्र आता कोरोनाग्रस्तांचा आकडा महाराष्ट्रात वाढत असताना शहरी नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे ग्रामीणभागात गावबंदी सुरु आहे तसेच शहरात कॉलनी आणि नगरांमध्ये मुख्य रस्त्यावर लाकडे रोवून कॉलनी आणि नगरांमध्ये प्रवेशबंदी केली जात आहे.

लालालजपयराय नगरात प्रवेश बंद
लालालजपयराय नगरात प्रवेश बंद
author img

By

Published : Apr 1, 2020, 1:20 PM IST

Updated : Apr 1, 2020, 3:49 PM IST

हिंगोली - सध्या कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. अनेक गावात मुख्यप्रवेश द्वारही बंद केल्याचे चित्र आहे. लॉकडाऊननंतरही शहरातील नागरिक बाईक आणि कारने रस्त्यांवर फिरताना दिसत होते. मात्र आता कोरोनाग्रस्तांचा आकडा महाराष्ट्रात वाढत असताना शहरी नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे ग्रामीणभागात गावबंदी सुरु आहे तसेच शहरात कॉलनी आणि नगरांमध्ये मुख्य रस्त्यावर लाकडे रोवून कॉलनी आणि नगरांमध्ये प्रवेशबंदी केली जात आहे. हिंगोली येथील लाला लजपत राय नगरातील नागरिकांनी हा फंडा अजमवला आहे. असाच फंडा इतरही नगरात आजमवण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

लालालजपयराय नगरात प्रवेश बंद
लालालजपयराय नगरात प्रवेश बंद

दिवसेंदिवस जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांची आकडेवारी वाढत आहे. आजघडीला राज्यात 320 च्या पुढे कोरोना बांधितांची संख्या झाली असून, जगात 7 लाख 54 हजारांच्याही पुढे आकडा गेला आहे. प्रशासन मोठ्या पोट तिडकीने बाहेर न निघण्याच्या सूचना देत आहेत. एवढेच काय तर, पोलीस अधिकारी कर्मचारी, आपला जीव धोक्यात घालून, सर्वांना घरात बसण्यासाठी सांगत आहेत. मात्र, बऱ्याच जणांवर याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. काहीजण तर, पोलिसांची नजर चुकवून रस्त्यावर येत आहेत. आपण नेमके कोणाला फसवतोय. स्वतःला की आपल्या कुटुंबाला त्यांना हेच समजेनासे झाले आहे.

वाड्या-वस्त्यानंतर आता शहरातील नगर आणि कॉलनीतही प्रवेशबंदीचे फलक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असून, दुसऱ्या जिल्ह्यातील अनेक कुटुंब हिंगोली जिल्ह्यात अडकले आहेत. एवढेच काय तर शहरभर फिरून पोलीस प्रशासनाचे अधिकारी रस्त्यावर फिरणाऱ्याला समजून सांगत आहेत. पण, कोणी लक्षच देत नसल्याने, लाला लजपत राय नगरातील नागरिकांनी चक्क मुख्य असलेले प्रवेशद्वारच पक्के बंद करून घेतले आहे. नगरात ना कुणाला प्रवेश ना कुणाला बाहेर जाऊ दिले जाणार, असा निर्णयच येथील नागरिकांनी घेतला आहे.

Last Updated : Apr 1, 2020, 3:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.