ETV Bharat / state

रंग लावू न दिल्याने तरुणास बेदम मारहाण; अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

author img

By

Published : Mar 22, 2019, 10:41 AM IST

रंग लावण्याच्या कारणावरुन तरुणांनी प्रदिपला बेदम मारहाण केली. यावेळी मारहाण करताना आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केल्याने त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रतिकात्मक छायाचित्र

हिंगोली - रंग न लावू दिल्याने तरुणास बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना सरकळी गावात घडली असून प्रदीप भाऊराव पाटोळे असे मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अनिल नितनवरे, नागेश गायकवाड यांच्यासह तीन अनोळखी तरुणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सरकळी फाट्यावर प्रदिपची दुचाकी अडवून नरसी नामदेव येथील अनिल नितनवरे, नागेश गायकवाड रंग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना प्रदिपने विरोध केला. त्यामुळे अनिल, नागेश, आणि इतरांनी 'तुझ्या घरी येऊन रंग लावतो, अशी धमकी दिली. काही वेळाने अनिल, नागेश हे आणि तीन अनोळखी तरुण प्रदिपच्या घरी पोहोचले. त्यांनी प्रदिपला जातीवाचक शिवीगाळ केली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणाचेही ऐकून घेतले नाही. त्यामुळे प्रदिप आणि त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर अनिल, नागेशसह त्या तरुणांनी प्रदिपला मारण्यास सुरुवात केली.

मारहाण सोडवण्यासाठी आलेल्या मध्यस्थांनाही आरोपी धमकावत असल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रदिपला बेदम मारहाण झाल्याने त्याला उभेही राहता येत नाही. त्यामुळे प्रदिपने पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अनिल नितनवरे, नागेश गायकवाड यांच्यासह अनोळखी तीन जणांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक थोरात हे करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान तरुमास मारहाण झाल्याने सरकळी या गावात दहशत पसरली आहे.

Intro:रंग पंचमी असताना युवकास रंग लावण्यासाठी गेलेल्या युवकाला अंगाला रंग लावू न देण्यास विरोध केल्याने पाच ते सहा एकत्रित युवकांच्या गावात जाऊन सर्वांसमोर बेदम मारहाण केल्याचा घटना आज दुपारी घडली. प्रदीप भाऊराव पाटोळे असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या फिर्यादीवरून नरसी नामदेव पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध ऑट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. रंग पंचमीच्या दिवशी गावात जाऊन मारहाण केल्याने ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Body:अनिल नितनवरे, नागेश गायकवाड दोघेही रा. नरसी नामदेव व तीन अनोळखी इसम असे आरोपीची नावे आहेत. आरोपीने संगनमत करीत सरकळी फाट्यावर फिर्यादी पाटोळे याची दुचाकी अडवून रंग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास पाटोळे यांनी विरोध केला. त्यामुळे आरोपीने 'तुझ्या घरी येऊन रंग लावतो, अशी धमकी दिली. तर काही वेळाने आरोपी पाटोळे यांच्या घरी पोहोचले आणि त्या ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करीत होते. त्याना ग्रामस्थांनी समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ते कोणाचेही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. दरम्यान, पाटोळे यांच्यात शाब्दिक वाद झाला. तर काही आरोपीने थेट मारण्यास सुरुवात केली. मारहाण सोडवण्यासाठी येणाऱ्यांना देखील आरोपी धमकावून ठेवत असल्याचे नागरिक सांगत होते. पाटोळे यास एवढी बेदम मारहाण करण्यात आली. त्याला साधे उभे देखील राहता येत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे आरोपी हे गाव शेजारच्याच गावचे असल्याने, ते फिर्यादी पाटोळे वर अनेक दिवसापासून डोळा ठेऊन होते.

Conclusion:आज रंग लावण्याच्या बहाण्यावरून पाटोळे सोबत कडाक्याचे भांडण झाले होते. तरीही रंग लावण्यास विरोध दर्शविला त्यामुळे, आरोपीला राग आणावर झाला अन काही वेळाने, फिर्यादीचे घर गाठले. त्या ठिकाणी करण्यात आलेल्या मारहाणीमुळे पाटोळे यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. या ठिकाणी सर्वप्रथम पोलिसांनी चोकशी केली अन ऑट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोउपनी थोरात हे तपास करीत आहेत. या घटनेने मात्र सरकळी गावात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

या बातमीत आपल्या फाईल मधील क्राईम चा लोगो वापरणे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.