ETV Bharat / politics

आंबेडकरांकडून तिसऱ्या आघाडीची घोषणा, यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाला मदत नाही - Prakash Ambedkar - PRAKASH AMBEDKAR

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) तिसऱ्या आघाडीची घोषणा केलीय. मात्र, या तिसऱ्या आघाडीचं चित्र अद्याप स्पष्ट नाही. तरीही आंबेडकर यांनी 11 जागांची पहिली उमेदवार यादी पत्रकार परिषदेत जाहीर केली असून यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाला मदत करणार नाही, असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलय.

Prakash Ambedkar
वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2024, 7:21 PM IST

Updated : Sep 21, 2024, 7:29 PM IST

मुंबई Prakash Ambedkar : राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जाईल, अशी शक्यता काहीजण वर्तवत होते. मात्र, अशा पद्धतीची कोणतीही शक्यता नाही कारण विधिमंडळाचं सभागृह खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते. विधिमंडळातील आमदारांचा कार्यकाळ संपत असून 27 नोव्हेंबर पूर्वी सरकार स्थापन होणं अपेक्षित आहे. त्यामुळं 15 नोव्हेंबरला निवडणुका घ्याव्याच लागतील. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं राज्यभरात तयारी सुरू केलीय. वंचितच्यावतीनं आता राज्यात पुन्हा एकदा समविचारी पक्षांची तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती, वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.

अद्याप नाव ठरलं नाही : वंचित बहुजन आघाडी आणि गोंडवाना पार्टी तसंच भारतीय आदिवासी पार्टी यांच्यासह जिल्हानिहाय ओबीसी संघटनांशी चर्चा झाली आहे. यातील बहुसंख्य ओबीसी संघटना आमच्यासोबत येण्यास तयार आहेत. त्यानुसार ही तिसरी आघाडी आम्ही तयार करत आहोत. या तिसऱ्या आघाडीचं नाव अद्याप निश्चित झालं नाही, लवकरच ते आम्ही ठरवू. तर राजू शेट्टी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांची मागणी करणारी यादी आमच्याकडं दिली आहे. मात्र, त्याचवेळी ते अन्य काही पक्षांशी चर्चा करत आहेत. त्यामुळं त्यांच्या आघाडीतील समावेशाबाबत अद्याप निश्चिती नाही. तर प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा झाली. मात्र त्यांचं आणि आमचं जमणार नाही, हे स्पष्ट झालय. त्याच्यामुळं बच्चू कडू आमच्यासोबत येणार नाहीत, असंही आंबेडकरांनी सांगितलं.

प्रतिक्रिया देताना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (ETV BHARAT Reporter)

काँग्रेस राष्ट्रवादीने निवडणुका लढवू नये : तिसऱ्या आघाडीचा फायदा हा नेहमीच भारतीय जनता पार्टीला होतो अशी चर्चा आहे, त्यामुळं यावेळी सुद्धा तो फायदा भाजपाला होईल का? असं विचारताच अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, जर राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अशी भीती वाटत असेल तर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरू नये, निवडणुका लढवू नयेत. अन्य कुणाला फायदा व्हावा म्हणून आम्ही निवडणुका लढवत नाही, तर आम्ही आमच्या ताकदीवर रणांगणात उतरत आहे.

यावेळी अन्य पक्षांना मदत नाही : लोकसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीनं तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी काही ठिकाणी वंचितनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मदत करण्याची भूमिका घेतली होती. आधी चर्चा झाल्यामुळं आम्हाला ती भूमिका घ्यावी लागली होती. मात्र, यावेळी आम्ही स्पष्टपणे कोणत्याही पक्षाला मदत करणार नाही आणि प्रत्येक ठिकाणी आमचा उमेदवार कसा जिंकून येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत, असंही आंबेडकर यांनी सांगितलं. तसंच या निवडणुकीबाबतचा जाहीरनामा आम्ही लवकरच प्रसिद्ध करणार आहे. तर राज्याचा विकास आणि रोजगार हे दोन प्रमुख मुद्दे आमच्या जाहीरनाम्यात असतील असंही त्यांनी सांगितलं.

वंचितची पहिली यादी जाहीर : उमेदवारांना प्रचारासाठी योग्य वेळ मिळावा म्हणून वंचित बहुजन आघाडीने आपली पहिली यादी जाहीर केली. यामध्ये सर्व समाजातील व्यक्तींना नेतृत्वाची संधी दिली आहे. रावेर मतदासंघातून शमिभा पाटील (तृतीय पंथी/ लेवा पाटील), सिंदखेड राजा मतदार संघातून सविता मुंढे (वंजारी), वाशिम मतदासंघातून मेघा किरण डोंगरे (बौद्ध), धामणगाव रेल्वे मतदासंघातून नीलेश विश्वकर्मा (लोहार), नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून विनय भांगे (बौद्ध), साकोली मतदासंघातून डॉ. अविनाश नन्हे (धीवर), नांदेड दक्षिण मतदासंघातून फारूक अहमद (मुस्लीम), लोहा मतदारसंघातून शिवा नारांगले (लिंगायत), औरंगाबाद पूर्व मतदासंघातून विकास दांडगे (मराठा), शेवगाव मतदासंघातून किसन चव्हाण (पारधी), खानापूरमधून संग्राम माने (वडार) यांची पहिल्या यादीत उमेदवारी निश्चित केली आहे.

हेही वाचा -

  1. पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभारावर कृषी विभागाचे गंभीर शेरे; अधिकाऱ्यांना खडसावत मुनगंटीवारांनी दिल्या 'या' सूचना - Pik Vima Yojana
  2. पितृपक्षातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, पितृपक्षाचा आमच्याशी संबंध नाही - काँग्रेसची प्रतिक्रिया - Maharashtra Politics
  3. जितेंद्र आव्हाडांवर अटकेची टांगती तलवार ? अटक टाळण्यासाठी ठाणे न्यायालयात जामीन अर्ज दाखल; नेमकं प्रकरण काय? - Jitendra Awhad

Last Updated : Sep 21, 2024, 7:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.