हिंगोली - जिल्ह्यातील औंढा-नागनाथ ते जिंतूर रस्त्यावर धार येथील पूर्णा नदीवरील पुलावरून भरधाव कार कोसळली. यात कारचा पूर्णपणे चेंदा-मेंदा झाला आहे. चार जण गंभीर जखमी झाले असून, यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. जखमीना नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे.
ओंढा-नागनाथ ते जिंतूर रस्त्यावर अपघात; कार पुलावरून खाली कोसळली - हिंगोली कार अपघात बातमी
जिंतूर ते ओंढा नागनाथ मार्गावरील धार फाट्याजवळ कारचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार पूर्णा नदीवर असलेल्या पुलावरून खाली कोसळली. त्यामुळे कारमधील रविकांत गोविंद तरटे, पूजा रविकांत तरटे, कमलाकर नागोरे, चालक सारंग बळीराम काळे सर्व राहणार रामनगर औरंगाबाद हे जखमी झाले आहेत.
हिंगोली
हिंगोली - जिल्ह्यातील औंढा-नागनाथ ते जिंतूर रस्त्यावर धार येथील पूर्णा नदीवरील पुलावरून भरधाव कार कोसळली. यात कारचा पूर्णपणे चेंदा-मेंदा झाला आहे. चार जण गंभीर जखमी झाले असून, यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. जखमीना नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे.
ग्रामस्थांनी केली जखमींना काढण्यासाठी मदत
घटनेची माहिती मिळताच, ओंढा नागनाथ पोलिसांनी व ग्रामस्थांनी धाव घेतली आणि जखमींना कार बाहेर काढण्यासाठी मदत केली. जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविले, तेथे डॉ. श्रीराम मोरे, आरोग्य कर्मचारी अश्विनी काटकर, झिरपे यांच्या पथकाने जखमींवर उपचार केले. कमलाकर नागोरे यांची प्रकृती स्थिर असून इतर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना नांदेड येथे हलविले आहे. जखमी पूजा रविकांत तरटे ह्या औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्या आपल्या नातेवाईकांसह प्रवास करीत होत्या दरम्यान हा अपघात घडला.