ETV Bharat / state

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात; दोघे जागीच ठार

हिंगोली शहरापासून जवळच असलेल्या नरसी टी पॉइंट जवळ वाहन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोठा अपघात झाला आहे.

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात
author img

By

Published : Jan 7, 2021, 7:06 PM IST

हिंगोली - शहरापासून जवळच असलेल्या नरसी टी पॉइंट जवळ वाहन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोठा अपघात झाला आहे. ओव्हरटेक करतांना समोरून आलेल्या जिपच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुभम कलकोटी (२५), रोहन शर्मा (२०), रा हिंगोली अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

दुचाकीला जोराजी धकड-

शुभम आणि रोहन हे दुचाकीने हिंगोलीकडून ओंढा नागनाथ मार्गे जात होते. दरम्यान नरसी पॉइंटवर वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या वाहनामुळे त्यांनी दुचाकीचे ब्रेक दाबले. तेवढ्यात मागून येणाऱ्या जीपने दुचाकीला जोराजी धकड दिली.

यात दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती ग्रामीण कळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके, जमादार रविकांत हरकाळ, गजानन पोकळे, यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी युवकांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मयत घोषित केले.

उशिरा पर्यंत सुरळीत केली वाहतूक-

घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. तसेच, दुतर्फा वाहनांच्या रांगा देखील लागल्या होत्या. पोलीस कर्मचाऱ्यांनी उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत केली. धडक देणारे वाहन हे निवडणूक कर्मचाऱ्यांचे होते. जिप चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती सह पोलीस निरीक्षक बंदखडके यांनी दिली.

हेही वाचा- नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.