हिंगोली - नववर्षाच्या तोंडावर जिल्हाभर चोख पोलीस बंदोबस्त आहे. अशाच परिस्थितीत हिंगोली शहरातील रिसाला बाजार भागात दोन गट आमने-सामने आल्यानंतर दगडफेकीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार नवीन वर्षाच्या तोंडावर घडल्याने गालबोट लागले आहे. तर त्या भागात तणावपूर्ण शांतता आहे. आरोपींचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. पंडित कच्छवे यांनी दिली.
तलवारीचा वापर
रिसाला बाजार हा अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. या भागावर पोलीस प्रशासनाचे बारकाईने लक्ष असते. मात्र 30 डिसेंबर रोजी रात्री दोन गटात दगडफेक झाली. ही दगडफेक एवढी भयंकर होती, की यामध्ये अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, तलवारीचा ही वापर झाल्याने पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला असून, व्हिडिओ मध्ये जेजे दिसून येत आहेत, त्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आहे. तर आजूनही धरपकड सुरू असल्याचे कच्छवे यांनी सांगितले.
'या' कारणाने वादाला सुरुवात
दोन तरुण एका बुलेटवरून फेरफटका मारीत होते, त्यांच्या चकरा वाढल्याने, त्यांना एकाजणाने हटकले तर बुलेट व रस्त्यावर उभे असलेल्या व्यक्तींमध्ये शाब्दिक वाद झाला. नंतर शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मग दोन्ही गट आमने-सामने भिडले. यामध्ये याभागात असलेल्या रोहित्राचेदेखील नुकसान झाले आहे.
या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
संजय माणिकराव डहाळे यांच्या फिर्यादीवरून शेख नोवमान शेख इब्राहिम, शेख सलमान शेख महेबुब, शेख अल्ताफ शेख अजीज, शेख आवेस उर्फ आरिफ शेख आजीस, शेख सलमान शेख इब्राहिम, शेख साहिल शेख लालवाले महेबूब, स. युसूफ, स. आयुब अमीन पठाण बिस्मिल्ला पठाण, स. वसीम स. करीम, शेख फैजान शेख मोहिद, स. अमीर उर्फ अप्पू स. मोईन, शेख आदील शेख अजीज, स. आक्रम स. मोईन, मो. इरफान दुला (रा. रिसाला बाजार), इम्तियाज खान पठाण, फरदिन खान मेहमूद खान, शेख अनिस शेख हुसेन व इतर 30 ते 40 जणांचा समावेश आहे.