हिंगोली- जिल्ह्यातील सेनगाव आणि औंढा नागनाथ नगरपंचायतीची ( Aundha Nagnath Nagar Panchayat ) निवडणूक प्रक्रिया ( Nagar Panchayat Election 2021 ) सुरू असताना कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी ओंढा नागनाथ येथील नागनाथ महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्रात कार्यकर्त्यांसह अनधिकृत प्रवेश केला ( Unauthorized Entry In Polling Station ). त्यामुळे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात ( Aundha Nagnath Police Station ) मतदान केंद्र अधिकारी दयानंद कल्याणकर यांच्या तक्रारीवरून बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा ( Case Against MLA Santosh Bangar ) दाखल केला आहे.
अंगरक्षक व कार्यकर्तेही सोबत
राज्यात स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थेच्या ( Local Body Election 2021 ) निवडणुका पार पडल्या त्याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व औंढा नागनाथ नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडली औंढा नागनाथ येथे मतदान सुरू असताना कळमनुरी मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांनी भगव्या रंगाचा रुमाल गळ्यात घालुन अंगरक्षक व कार्यकर्त्यांना घेऊन अनधिकृत रित्या मतदान केंद्रात प्रवेश केला.
मतदान यंत्राशी झाली छेडछाड?
बांगर हे मतदान यंत्राजवळ जाऊन संपूर्ण बारकाईने पाहणी करत असल्याचे त्या व्हायरल व्हिडीओमध्ये ( MLA Santosh Bangar Viral Video ) दिसत आहे. त्यामुळे त्यांनी मतदान यंत्रात छेडछाड केल्याची शक्यता नाकारताच येत नाही. या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अपक्ष उमेदवार जी. डी. मुळे यांनी केली आहे.