ETV Bharat / state

हिंगोलीत ६० पोती पाणी पाऊच जप्त; नगरपालिका पथकाची कारवाई

आठवडाभरापासून नगर पालिकेच्या पथकाने कारवाईचा धडाका लावला आहे. या महिन्यातील ही सहावी कारवाई आहे. नगरपालिका पथकाने तीन ठिकाणी छापा टाकला होता. त्यातील पाणी पाऊच निर्मिती कारखान्यावर टाकलेल्या छाप्यात पथकाने पाणी पाऊच असलेली ६० पोती जप्त केली आहेत.

author img

By

Published : Feb 26, 2020, 7:11 PM IST

Updated : Feb 26, 2020, 9:41 PM IST

hingoli muncipality
पाणी पाऊच

हिंगोली - शहरातील सावरकर नगरमध्ये नगर पालिकेच्या पथकाने मंगळवारी अवैधरित्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्या तीन ठिकाणी छापा मारला आहे. यात एका ठिकाणाहून हजारो रुपये किमतीचा एक वेळ वापरला जाणार प्लास्टिक आणि पाणी पाऊचचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

माहिती देताना प्राशसकीय अधिकारी श्याम माळवटकर

आठवडा भरापासून नगर पालिकेच्या पथकाने कारवाईचा धडाका लावला आहे. या महिन्यातील ही सहावी कारवाई आहे. नगर पालिका पथकाने तीन ठिकाणी छापा टाकला होता. त्यातील पाणी पाऊच निर्मिती कारखाण्यावर टाकलेल्या छाप्यात पथकाने पाणी पाऊच असलेले ६० पोते जप्त केले आहे. तर, दुसऱ्या दिवशी इंदिरा गांधी चौक येथील देशी दारूच्या दुकानात छापा टाकून तेथूनही पाण्याचे पाऊच जप्त केले आहे. त्याचबरोबर, शहरातील मेघा साडी सेंटर येथे देखील छापा टाकून पथकाने ५० हजार रुपयांचे एक वेळ वापराचे प्लास्टिक जप्त केले आहे.

तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत पालिकेने अवैधरित्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांकडून २५ हजारांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. मात्र, प्लास्टिक विरोधी कारवाईच्या वाढत्या आकड्यांवरून प्लास्टिक बंदी जनजागृतीचा फारसा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. ही कारवाई नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, बाळू बांगर, पंडित मस्के आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा- हर हर महादेवाच्या जयघोषात औंढा नागनाथमध्ये पार पडला रथोत्सव

Last Updated : Feb 26, 2020, 9:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.