ETV Bharat / state

दिलासादायक..! हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवसात 43 रुग्ण कोरोनामुक्त - Hingoli district total corona positive

नव्याने आढळलेल्या रुग्णापैकी अँटिजण तपासणीत सेनगाव येथे अगोदरच्या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील 2, अन वटकळी येथे 1 असे 3 रुग्ण आढळले आहेत. तर ''आर टी पी सी आर टी'' चाचणीत वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन येथील 1, कोवठा रोड वरील भागात 1, शास्त्री नगर 1, ओंढा शहरात 1 असे चार असे एकूण 7 रुग्ण आढळले आहेत

Hingoli corona update
Hingoli corona update
author img

By

Published : Aug 9, 2020, 10:12 AM IST

हिंगोली- जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा कहर सुरू आहे. शनिवारी हिंगोली प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये एकूण 43 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर नव्याने सात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 815 वर पोहोचली आहे. तर 606 रुग्ण हे बरे झाले आहेत. सध्या 200 रुग्णांवर विविध कोरोनावार्ड, कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार सुरू असल्याची शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी सांगितले.

नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी अँटिजण तपासणीत सेनगाव येथे अगोदरच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील 2, अन वटकळी येथे 1 असे 3 रुग्ण आढळले आहेत. तर ''आर टी पी सी आर टी'' चाचणीत वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन येथील 1, कोवठा रोड वरील भागात 1, शास्त्री नगर 1, ओंढा शहरात 1 असे चार असे एकूण 7 रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात आता प्रशासकीय अधिकारीही कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावने चिंता व्यक्त केली जात आहे. या ही परिस्थितीत शनिवारी उपचारामुळे एकूण 43 रुग्ण हे बरे झाले आहेत. या मध्ये लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटर मधील 2, अन कळमनुरी 33 तर हिंगोली येथील 8 रुग्ण बरे झालेले आहेत.

सध्याच्या परिस्थितीत एकूण 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर उपचार घेत असलेल्यांपैकी 8 रुग्णांची प्रकृती ही गंभीर असल्याने, त्याना ऑक्सिजन सुरू आहे तर दोघांची प्रकृती अति गंभीर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.