ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीसाठी हिंगोलीत ३८ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी हिंगोलीत ३८ इच्छुक उमेदवारांनी ५८ नामनिर्देशन पत्र दाखल केले.

हिंगोलीत ३८ उमेदवारांनी दाखल केले ५८ नामनिर्देशन पत्र
author img

By

Published : Mar 26, 2019, 11:54 PM IST

हिंगोली - आज हिंगोली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली होती. दुसऱ्या टप्यात पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँगेस, महायुती, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करून नामनिर्देशन पत्र दाखल केले. अनेक पक्षाचे दिग्गज आज हिंगोली येथे दाखल झाले होते. ३८ इच्छुक उमेदवारांनी ५८ नामनिर्देशन पत्र निवडणूक विभागाकडे दाखल केले.

हिंगोलीत ३८ उमेदवारांनी दाखल केले ५८ नामनिर्देशन पत्र

हिंगोली येथील लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. महायुतीकडून नांदेड विधानसभा दक्षिणचे आमदार हेमंत पाटील तर प्रथम सेना, नंतर भाजप आणि आता काँग्रेसमध्ये उडी घेऊन उमेदवारी मिळविणारे सुभाष वानखेडे, वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यातच अपक्ष म्हणून वसमत विधानसभेचे अॅड. शिवाजी जाधव यांनीदेखील शक्तिप्रदर्शन करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या पक्षाच्यावतीने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शनासाठी ग्रामीण भागातून हिंगोलीत वाहने दाखल झाली होती. त्यामुळे खचाखच वाहतुकीने व नागरिकांनी रस्ते भरून गेले होते. तर आपापल्या उमेदवाराला प्रतिसाद देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनीही एकच गर्दी केली होती. महायुतीच्या उमेदवारासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे हिंगोली येथे येणार होते. हिंगोलीत एक हेलिकॉप्टर दाखल होताच ग्रामीण भागातील भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांनी हेलिपॅडकडे धाव घेतली. हेलिकॉप्टरमध्ये नेमके कोण असेल याचा प्रत्येकाला प्रश्न पडला होता. मात्र, जेव्हा हेलिकॉप्टरमधून अशोक चव्हाण उतरले तेव्हा कुठे भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराकडे धाव घेतली.

तर महायुतीच्या उमेदवाराला प्रतिसाद देण्यासाठी अर्जुन खोतकर, दिलीप कांबळे आदी हिंगोलीत दाखल झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्यहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ झाला. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तर जल्लोष करत नामनिर्देशन पत्र दाखल केले. एकंदरीत आज हिंगोलीचे वातावरण पूर्णतः उत्साही झाल्याचे पहावयास मिळाले. घोषणाबाजीने हिंगोली परिसर दणाणून गेला होता. तर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस प्रशासनाच्यावतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Intro:आज हिंगोली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली होती. दुसऱ्या टप्यात पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँगेस, महायुतीच्या व वंचित बहुजन आघाडीच्या, अपक्ष उमेदवारानी शक्तिप्रदर्शन करून नामनिर्देशन पत्र दाखल केले. अनेक पक्षाचे दिगग्ज आज हिंगोली येथे दाखल झाले होते. ३८ इच्छुक उमेदवाराने ५८ नामनिर्देशन पत्र निवडणूक विभागाकडे दाखक केले.

Body:हिंगोली येथील लोकसभा निवडणुकीकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. महायुतीकडून नांदेड विधानसभा दक्षिणचे आमदार हेमंत पाटील तर प्रथम सेना, नंतर भाजप अन आता काँग्रेस मध्ये उडी घेऊन उमेदवारी मिळविनारे सुभाष वानखेडे, वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यातच अपक्ष म्हणून वसमत विधानसभे चे ऍड शिवाजी जाधव यांनी देखील शक्तिप्रदर्शन करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अप आपल्या पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शनासाठी ग्रामीण भागातून हिंगोलीत वाहने दाखल झाली होती त्यामुळे खचाखच वाहतुकीने व नागरिकांनी रस्ते भरून गेले होते. तर आप आपल्या उमेदवाराला प्रतिसाद देण्यासाठी पद्धधिकाऱ्यांनाही एकच गर्दी केली होती. महायुतीच्या उमेदवारासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे हिंगोली येथे येणार होते. मात्र हिंगोलीत एक हेलिकॉप्टर दाखल होताच ग्रामीण भागातील भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांनी हेलिपॅड कडे धाव घेतली खरे. मात्र हेलिकॉप्टर मध्ये नेमकं कोण असेल याचा देखील प्रत्येकाला प्रश पडला होता. जेव्हा हेलिकॉप्टर मधुन अशोकराव चव्हाण उतरले तेव्हा कुठे भाजल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराकडे घाव घेतली.

Conclusion:तर महायुतीच्या उमेदवाराला प्रतिसाद देण्यासाठी अर्जुन खोतकर, दिलीप कांबळे आदी हिंगोलीत दाखल झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्यहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ झाला. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तर जल्लोष करत नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. एकंदरीत आज हिंगोलीचे वातावरण पुर्णतः उत्साही झाल्याचे पहावयास मिळाले. घोषणाबाजीने हिंगोली परिसर दणाणून गेला होता. तर जिल्हाधिकारी परिसरात पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नामनिर्देशन भरतानाचे व्हिज्युअल ftp केले आहेत. तसेच या पूर्वी पाठवलेले रॅलीचे व्हिज्युअल देखील बातमीत वापरावेत.,
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.