ETV Bharat / state

तापमानाचा पारा वाढला; हिंगोली जिल्ह्यात उष्माघाताचे दोन बळी - Hingoli

महाराष्ट्रात पुन्हा उष्णतेची लाट पसरली आहे. चार ते पाच दिवसांपासून तापमानाचा पारा 45 अंशावर जाऊन पोहोचला आहे. उन्हाच्या झळा असह्य होत असल्याने नागरिक बैचेन झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे जीव लाहीलाही होत आहे. या उन्हाळ्यात आतापर्यंत सहा जणांचा उष्माघाताने बळी गेला आहे.

तापमानाचा पारा वाढला; हिंगोली जिल्ह्यात उष्माघाताचे दोन बळी
author img

By

Published : May 25, 2019, 6:53 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला आहे. वाढत्या तापमानामुळे वसमत तालुक्यातील सेलू येथील एका २२ वर्षीय युवकाचा तर कळमनुरी तालुक्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. एका पाठोपाठ उष्माघाताने दोघांचा बळी गेल्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरुणाच्या मृत्यूची कुरुंदा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे, तर मृत महिलेची ओळख पटवली जात आहे.

साहस रमेश सेलूकर(वय २२) असे तरुणाचे नाव आहे. महाराष्ट्रात पुन्हा उष्णतेची लाट पसरली आहे. चार ते पाच दिवसांपासून तापमानाचा पारा 45 अंशावर जाऊन पोहोचला आहे. उन्हाच्या झळा असह्य होत असल्याने नागरिक बैचेन झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे जीवाची लाही-लाही होत आहे. या उन्हाळ्यात आतापर्यंत सहा जणांचा उष्माघाताने बळी गेला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील सर्वच आरोग्य विभागात उष्मघात कक्ष उभारला आहे. मात्र, तरी देखील जिल्ह्यात उष्मघाताच्या बळींमध्ये वाढ होत आहे. उष्मघात कक्षाचा उपयोग तरी काय? अशी चिंता नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

दुसऱ्या घटनेत एका ५० वर्षीय महिलेचा उष्माघाताने बळी गेला आहे. त्या महिलेच्या मृतदेहाजवळ एक नवीन कोरी साडी, नायलॉनच्या पिशवीमध्ये एका कापडी पिशवीत बुंदी आहे. यावरून स्पष्ट होते की, ही महिला कोणत्या तरी विवाह समारंभाला गेली असावी. विवाह सोहळा आटपून आल्यानंतर असह्य उन्हाच्या झळा सहन न झाल्याने सावलीचा आधार घेतला अन तिथेच तिचा मृत्यू झाला. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरल्याने याचा परिणाम थेट शरीरावर होत आहे. वाढत्या तापमानामुळे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णांची एकच गर्दी होत आहे.

मोजो वरून बातमी अपलोड केलीय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.