ETV Bharat / state

24 वर्षीय तरुणाची पुजारीटोला धरणात आत्महत्या - Gondia Latest news

संतोष दोनोडे हा साखरीटोला (सातगाव) येथील रहिवासी होता. किरकोळ घरगुती वादावरून हा तरुण १२ जुलैच्या रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला मोटारसायकलने घरातून निघून गेला होता.

संतोष दोनोडे
संतोष दोनोडे
author img

By

Published : Jul 13, 2020, 10:00 PM IST

गोंदिया - सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणात तरुणाने आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली आहे. ही घटना आज सकाळच्या दरम्यान उघडकीस आली आहे. संतोष शामलाल दोनोडे असे 24 वर्षीय मृताचे नाव आहे.

संतोष दोनोडे हा साखरीटोला (सातगाव) येथील रहिवासी होता. किरकोळ घरगुती वादावरून हा तरुण १२ जुलैच्या रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला मोटारसायकलने घरातून निघून गेला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने घरच्या लोकांनी त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने प्रतिसाद दिला नाही. सकाळी धरणावर मासे पकडण्यासाठी गेलेल्या काही लोकांना मोटारसायकल दिसली.

मोटारसायकलच्या डिक्कीत तरुणाने मोबाईल व पैसे ठेवले होते. मोबाईलची रिंग वाजत असल्याने शंका आली. तेव्हा काही लोकांनी त्याच्या घरी फोनवरून माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतोषचा मृतदेह धरणाबाहेर काढला. मृतदेह हा शवविच्छेदनाकरिता सालेकसा येथील रुग्णालयात नेण्यात आला आहे.

मृत संतोषचे वडील शामलाल दोनोडे हे मुळचे सलंगटोला येथील रहिवासी आहेत. व्यवसाय करण्यासाठी ते साखरीटोला येथे स्थायिक झाले होते. साखरीटोला येथे त्यांचे दोनोडे कृषी केंद्र आहे. संतोष हा कृषी केंद्राचे काम बघत होता. व्यसन केल्याने त्याला घरच्यांनी हटकले होते. राग मनात धरून तो घरून निघून गेला होता. सलेकसा पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने साखरीटोला गावात शोककळा पसरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.