ETV Bharat / state

गोंदियात कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन, दिला 'हा' इशारा

राज्यात १९ मे २०१९ पासून हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. तर चौथा आणि अंतिम टप्पा ११ जुलै पासून पुकारण्यात आला आहे. याचेच औचित्य साधून आमगाव तालुक्यातील कंत्राटी आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून मागण्यांचे निवेदन अधिकारी देण्यात आले.

work stoppage agitation of health workers in gondia
गोंदियात कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन
author img

By

Published : Jun 16, 2020, 5:04 PM IST

Updated : Jun 16, 2020, 6:12 PM IST

गोंदिया - देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय आरोग्य पद्धतीने नेमण्यात आलेल्या डॉक्टर आणि परिचारिका युद्धस्तरावर काम करत आहेत. मागील दोन महिन्यांपासून ते अहोरात्र सेवा देत आहेत. मात्र, अनेक वर्षांच्या सेवेनंतर ही डॉक्टर व परिचारिकांची शासन दरबारी कोणतीच दखल घेतली जात नाही. म्हणून या कंत्राटी कामबंद आदोलन केले आहे. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभिमान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित शासन सेवेमध्ये समायोजनाची मागणी केली आहे.

गोंदियात कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन, दिला 'हा' इशारा

राज्यात १९ मे २०१९ पासून हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. तर चौथा आणि अंतिम टप्पा ११ जुलै पासून पुकारण्यात आला आहे. याचेच औचित्य साधून आमगाव तालुक्यातील कंत्राटी आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून मागण्यांचे निवेदन अधिकारी देण्यात आले.

हेही वाचा - रावेर मतदारसंघातील भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे निधन

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काम सुरू ठेवून टप्याटप्याने आंदोलन केले. मात्र, शासनाने लक्ष न दिल्याने नाईलाजाने कठोर पाऊल उचलून कामबंद आंदोलन सुरू करावे लागले. राज्यात जर आरोग्य विषयक आणीबाणीची स्थिती निर्माण झाली तर त्यास शासन जबाबदार राहील, असा इशाराही राष्ट्रीय आरोग्य अभिमान कर्मचारी संघटनेने दिला आहे.

Last Updated : Jun 16, 2020, 6:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.