ETV Bharat / state

गोंदियातील शरणार्थी कॅम्पमधील जीर्ण घराचे छत कोसळले.. महिला जखमी - बंगाली शरणार्थी कॅम्प गोंदिया

कामठा/बिरसी विमानतळ लगत बंगाली शरणार्थी कॅम्पमधील कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. परिणामी तेथील नागरिक जीर्ण अवस्थेत आलेल्या घरात जीव मुठीत घेवून दिवस काढत आहेत.

women-injured-in-roof-collapses-in-gondia
गोंदियातील शरणार्थी कॅम्पमधील जीर्ण घराचे छत कोसळले
author img

By

Published : Jun 9, 2020, 7:09 PM IST

गोंदिया - जिल्ह्याच्या गोंदिया तालुक्यातील रावणवाडी जवळील कामठा/बिरसी येथील बंगाली शरणार्थी कॅम्पमधील एका जीर्ण घराचे छत कोसळले आहे. या घटनेत ८५ वर्षीय वृध्द महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुंदरी चक्रवर्ती असे जखमी महिलेचे नाव आहे.

कामठा/बिरसी विमानतळ लगत बंगाली शरणार्थी कॅम्पमधील कुटुंबाच्या पुर्नवसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. परिणामी तेथील नागरिक जीर्ण अवस्थेत आलेल्या घरात जीव मुठीत घेऊन दिवस काढत आहेत. असे असतानाही प्रशासन मात्र सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. त्यातच पावसात घराचे छत कोसळले. या घटनेत घरात झोपलेली ८५ वर्षीय वृद्धा गंभीर जखमी झाली.

महिलेला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या घटनेने प्रशासनाचा उदासीन कारभार आणखी चव्हाट्यावर आला आहे. पण, या शरणार्थी कॅम्पमध्ये राहणाऱ्या कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रशासन कधी सोडवणार व त्यांना त्यांची घरे कधी देणार, असा प्रश्न कायम आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.