गोंदिया - एकीकडे आरएफओ दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण शांत होत असतानाच गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव शहराच्या आदर्श कॉलनीतील एका ग्रामसेवकाच्या आत्महत्येला वेगळे वळण लागले आहे. ग्रामसेवक शिवकुमार रहांगडाले यांनी विष पिऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीस अटक करण्याची मागणी करत पत्नीने पतीचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर घेऊन जाण्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी शिक्षक असून त्याची पत्नी सरपंच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव तहसीलच्या ग्राम कुराडी येथे कार्यरत ग्रामसेवक शिवकुमार रहांगडाले यांनी 24 मार्च रोजी रात्री उशिरा तीन वाजताच्या सुमारास विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ज्यामुळे 29 मार्चला नागपूरमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत शिवकुमार रहांगडाले यांनी लिहिलेले सोसाईड नोटच्या आधारावर 28 मार्चला गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानुसार कुराडी सरपंचाचे पती मार्तंड पारधी यांना कलम 309 व 109 च्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आरोपीला गोंदिया न्यायालयाकडून 29 मार्चला जामीन मंजूर करण्यात आला व 28 मार्चला ग्रामसेवक रहांगडाले यांचा मृत्यू झाला.
पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन -
मृताची पत्नी अंतकला रहांगडाले तसेच ग्रामसेवक संघटना यांनी आरोपीला कलम 306 अंतर्गत तत्काळ अटक करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली. परंतु न्याय न मिळाल्यामुळे मृत ग्रामसेवकाची पत्नी अंतकला रहांगडाले आपल्या मुलाबाळांसह व परिवारासोबत पती मृतदेह घेऊन पोलीस ठाण्याच्या दारात पोहोचली. संतप्त नातेवाईकांनी 30 मार्च दुपारनंतर धरणे आंदोलन केले. आरोपीला 306 कलमांतर्गत तत्काळ अटक करून न्यायाची मागणी केली. या प्रकरणात ग्रामसेवक जिल्हा व तहसील संघटना मृताच्या परिवारासोबत होते. त्यानुसार गोरेगाव पोलिसांनी त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात दाद मागितली तेव्हा न्यायालयाने आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल यांनी गोरेगावचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना कलम 306 लावण्याचे आदेश दिले व मृताच्या कुटुंबीयांना आरोपीला 24 तासाच्या आत