ETV Bharat / state

पाणी पुरवठ्याअंतर्गत बांधलेल्या विहिरीत घोटाळा; अंभियंत्यासह कंत्राटदारावर कारवाईची मागणी - devari gondia

विहिरीचे बांधकाम एका बाजुला झुकले असून ती कोसळण्याची सुध्दा शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांनी ही बाब सदर कंत्राटदार आणि अभियंत्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी विहिरीला दोरीने बांधून जेसीबी, पोकलॅड सारख्या यंत्राने सरळ करून देण्याचे आश्वासन दिले.

विहीर
author img

By

Published : Jun 18, 2019, 8:02 AM IST

गोंदिया - देवरी तालुक्यातील पालांदूर(जमी) येथे चुंभली नदीच्या तिरावर पुरक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात आले. मात्र, बांधकाम तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याने विहीर एका बाजूला झुकलेली आहे. त्यामुळे नदीचा प्रवाहाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कंत्राटदारासह अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

विहीरबद्दल माहिती देताना ग्रामस्थ

स्थानिक पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत १ कोटी ४ लाख ३० हजार १७५ रुपये खर्चाची नळ योजना १६-१७ मध्ये मंजूर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत अंदाजपत्रकाप्रमाणे १९ लाख रुपये खर्चून चुंभली नदीच्या तिरावर विहिरीचे बांधकाम करण्यात आले. या विहिरीतून नागरिकांना पाणी मिळणार होते. मात्र, ज्या विहिरीतून पाण्याचा उपसा करून पुरवठा करावयचा होता. ती विहीरच सदोष असल्याने १ कोटी रुपयाच्या पाणी पुरवठा योजनेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित अभियंत्याने २० फुट व्यासाच्या विहिरीचे बांधकाम करताना वरच्या भागाला १९.६ व्यासाची रिंग तयार केली. परिणामी विहिरीचे बांधकाम एका बाजुला झुकले असून ती कोसळण्याची सुध्दा शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांनी ही बाब सदर कंत्राटदार आणि अभियंत्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी विहिरीला दोरीने बांधून जेसीबी, पोकलॅड सारख्या यंत्राने सरळ करून देण्याचे आश्वासन दिले. पैसे वाचवण्यासाठी कंत्राटदारांनी विहिरीचा व्यास वरील भागाला कमी घेतल्याचे बोलले जात आहे. विहिरीचे सदोष बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच अभियंत्यावर निलबंनाची कारवाही करून विहीर बांधकामाचा खर्च वसूल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 17-06-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME:- MH_GON_!7.JUNE.19_CORRUPTION_7204243
पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचे सदोष बांधकाम
Anchor:- स्थानिक पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत देवरी तालुक्यातील पालांदूर (जमी) येथे पूरक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत १ कोटी ४ लाख ३० हजार १७५ रुपये खर्चाची नळ योजना सन १६-१७ मध्ये मंजूर करण्यात आली होती. या योजने अंतर्गत अंदाजपत्रकाने प्रमाणे १९ लाख रुपये खर्चून चुंभली नदीच्या तिरावर विहिरीचे बांधकाम करण्यात आले. परंतु सदर विहिरीचे बांधकाम तांत्रीकदृष्ट्या योग्य नसल्याने ती एका बाजूला झुकल्याने नदीच्या प्रवाहाने पूर्णत: कोलमडण्याची शक्यता आहे. या प्रकाराला पूर्णपणे कंत्राटदार व संबंधित अभियंता दोषी असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतने केली आहे. तालुक्यातील पालांदूर (जमी) येथे तयार होणा-या पूरक नळयोजनेचे पाणी नागरिकांना मिळणार होते. परंतु ज्या विहीरीतून पाण्याचा उपसा करुन पुरवठा करावयचा होता. ती विहीरच सदोष असल्याने १ कोटीच्या पाणी पुरवठा योजनेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित अभियंत्याने २० फुट व्यासाठी विहिरीचे बांधकाम करताना वरच्या भागाला १९.६ व्यासाची रिंग तयार केली. परिणामी विहिरीचे बांधकाम एका बाजुला झुकले असून ती कोसळण्याची सुध्दा शक्यता नाकारता येत नाही. गावक-यांनी ही बाब सदर कंत्राटदार आणि अभियंत्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी विहिरीला दोरीने बांधून जेसीबी, पोकलॅड सारख्या यंत्राने सरळ करुन देण्याच्या आश्वासन दिल्याने गावकरी सुध्दा विचारात पडले आहे. पैसे वाचविण्यासाठी कंत्राटदारांनी विहिरीचा व्यास वरील भागाला कमी घेतल्याचे बोलल्या जाते. विहिरीचे सदोष बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे व अभियंत्यावर निलबंनाची कारवाही करून विहीर बांधकाचा खर्च वसूल करण्याची मागणी पालांदूर (जमी) येथील नागरिकांची एकमुखी मागणी आहे.
BYTE:- सुनंदा बहेकार (प.स. सभापति देवरी)
BYTE:- संदीप पवार (उप अभियंता)
BYTE:- तुलसीदास खोबरागड़े (गावकरी) Body:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.