ETV Bharat / state

अंकूर फुटलेले धान स्वीकारण्यास केंद्राचा नकार, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका - अवकाळी पाऊस

केंद्राच्या नियोजन शुन्यतेमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे जवळपास ७ हजार पोते धान पावसात भिजले.

rain
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका
author img

By

Published : Feb 8, 2020, 8:59 PM IST

Updated : Feb 8, 2020, 9:58 PM IST

गोंदिया - जिल्ह्यात गेल्या दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शासकीय धान (भात पीक) खरेदी केंद्राला बसला आहे. तिगाव खरेदी केंद्रात गेल्या २० ते २५ दिवसांपासून परिसरातच धान साठवून ठेवण्यात आले होते. या धानाला पावसामुळे अंकूर फुटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका

हे धान केंद्रावरून परत नेण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्रीच्या माध्यमातून तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरू आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि त्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये, हा यामागचा मुख्य उद्देश. मात्र, आता याच केंद्राच्या नियोजन शुन्यतेमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे जवळपास ७ हजार पोते धान पावसात भिजले.

हेही वाचा - सारखे सांगून समजत नसेल तर धडा शिकवावा लागतो, पवारांचा भाजपला टोला

२२ डिसेंबर ते १३ जानेवारीदरम्यान गोदाम भरल्यामुळे खरेदी बंद करण्यात आली होती. त्यामुळे मागील एक महिन्यापासून शेतकऱ्यांचे धान परतीच्या पावसात भिजत राहिले. परिणामी या पिकाला आता अंकुर फुटले आहे. हे अंकुरीत आणि ओले धान आम्ही घेणार नाही, अशी भुमिका धान खरेदी केंद्राने घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

हेही वाचा - ...म्हणून पोळीमध्ये लपवून पाठवली चिठ्ठी

आमगाव तालुक्यातील आमगाव, गोरठा, कालीमाटी, तिगाव, अंजोरा, कट्टीपार या सहा केंद्रावर धान खरेदी करण्यात येते. या केंद्रावर धान खरेदी करण्यासाठी पुरेशी गोदामांची व्यवस्था नसल्यामुळे अनेक दिवस धान खरेदी केंद्राबाहेर पडून असते. आधारभुत धान खरेदी केंद्रावर सुरक्षा भिंत नसल्यामुळे मोकाट जनावरे परिसरात येऊन धान्यांची नासाडी करतात, याचा फटका वारंवार शेतकऱ्यांना बसतो.

Intro:Repoter :- OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 08-02-2020
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_08.feb.20_paddy sprouts_7204243
अवकाळी पावसाने धान केंद्रावरील धानाला फुटले अंकुर
खरेदी केंद्राचे दुर्लक्ष : शेतकरी पुन्हा अडचणीत..
Anchor:- गोंदिया जिल्ह्यातील गुरूवारी आणि शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शासकीय धान खरेदी केंद्रावरील धानाला बसला आहे. आमगांव तालुक्यात एकूण सहा धान खरेदी केंद्र आहेत. यातील तिगाव धान खरेदी केंद्र यात अंदाजे वीस ते पंचवीस दिवसापासून शेतकऱ्याचे धान खरेदी न करता त्यांचे धान खरेदी केंद्राच्या परिसरातच साठवून ठेवलेल्या आहेत. शासकीय धान खरेदी केंद्रावरील अनेक शेतक-यांचे धान भिजल्याने धानाला आता अंकूर फुटले. त्यामुळे शेतक-यांना केंद्रावरून धान परत नेण्याची वेळ आली आहे. मात्र या मुळे आता शेतकरी अडचणीत आला आहे.
VO :- जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्रीच्या माध्यमातुन तालुक्यात शेतक-यांचे धान खरेदी केंद्र सुरू आहे. शेतक-यांना योग्य भाव मिळावा व त्यांची व्यापा-यांकडुन लुट होउ नये याकरीता धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र केंद्रावरील नियोजन शुन्यतेमुळे शेतक-यांचे धान पावसात भिजले. शुक्रवारी सकाल पासून सुरु असलेल्या पावसामुळे जवळपास सात हजार पोते धान पावसात भिजले २२ डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान गोदाम फुल्ल झाल्यामुळे खरेदी बंद होती. त्यामुळे मागील एक महिन्यापासुन शेतक-यांचे धान परतीच्या पावसात भिजत राहिले. परिणामी अनेक शेतक-यांच्या धानाला अंकुर फुटले आहे. हे अंकुरीत धान व ओले धान आम्ही घेणार नाही अशी भुमिका धान खरेदी केंद्राने घेतली आहे. त्यामुळे शेतक-यांवर मोठे संकट कोसळले आहे.
BYTE :- हितेश येडे (शेतकरी)
आमगाव तालुक्यातील आमगाव, गोरठा, कालीमाटी, तिगाव, अंजोरा, कट्टीपार या सहा केंद्रावर धान खरेदी करण्यात येते. या केंद्रावर शेतक-यांच्या धान खरेदी करण्याकरीता पुरेशा गोदामाची व्यवस्था नसल्यामुळे अनेक दिवस धान खरेदी केंद्राबाहेर पडुन असतो. आधारभुत धान खरेदी केंद्रावर सुरक्षा भिंत नसल्यामुळे मोकाट जनावरे परिसरात येतात व धानाची पोती फाडतात व धान खराब करतात त्याचा फटकाही शेतक-यांना बसतो.Body:VO:- Conclusion:
Last Updated : Feb 8, 2020, 9:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.