गोंदिया - जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याचे पहायला मिळत होते. तसेच धुक्याचाही प्रभाव जाणवत होता. मात्र, गुरूवारी पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडला आहे.
हेही वाचा... उस्मानाबादमध्ये वेळ अमावस्या उरकून परतणाऱ्या बैलगाडीला उडवले ट्रकने; चार जणांसह बैलांचा मृत्यू
अचानक आलेल्या पावसामुळे, शेतात लागवड केलेल्या तूर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात हवामान खात्याकडून पाऊस पडण्याचे संकेत देण्यात आले होते. या बदलत्या वातावरणाचा शेती प्रमाणेच मानवी जिवनावर देखील परिणाम होणार आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामानंतर शेतकऱ्यांनी शेतात लाख, लाखोरी, उडीद, मुग, वाटाणा, हरभरा, जवस, करडई, तूर, भुईमुग यांसह अन्य कडधान्ययुक्त पिकांची लागवड केली आहे. यातही जिल्ह्यात तूर पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.
हेही वाचा... बीडमध्ये राजकारण पेटलं; विनायक मेटेंनी घरात घुसून धमकावल्याचा पं. स. सदस्याच्या दिराचा आरोप
सध्या तूर पिकाला फुलोरा येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच ढगाळ वातावरण आणि पाऊस पडल्याने पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच धान पिकाचेही नुकसान होणार आहे. जवळपास २० टक्के शेतकऱ्यांनी कापणी केलेले धानपीक शेतात पडून आहेत. त्यात आता पाऊस पडल्याने हे पीकही खराब झाल्यास शेतकरी पुन्हा संकटात सापडेल.
हेही वाचा... जामियामधील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनामागे 'आयएसआय'चा हात