ETV Bharat / state

गोंदियात अनोखा विवाहसोहळा.. बेटी बचाव, बेटी पढाओ अन् स्वच्छ भारतचा संदेश

गोंदियातील एका तरूणाने सामाजिक संदेश देत अनोख्या पद्धतीने विवाह केला आहे. या विवाहसोहळ्यातून त्याने 'स्वच्छ भारत' आणि 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'सारखे संदेश दिले आहेत.

गोंदियात अनोखा विवाहसोहळा
author img

By

Published : May 13, 2019, 6:00 PM IST

गोंदिया - जिल्ह्याच्या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त देवरी तालुक्यात राहणाऱ्या कुलदीप लांजेवार या तरुणाने आपल्या विवाह सोहळ्यातून बेटी बचाओ, बेटी पढाओ तसेच स्वच्छ भारतचा संदेश दिला आहे. या आगळ्यावेगळ्या विवाहामुळे लग्नाला आलेले वऱ्हाडी लग्न मंडपात पोहचताच दंग झाले.

देवरी तालुक्यात राहणारा कुलदीप हा लहानपणापासूनच राष्ट्रसंत तुकडोजी महराजांच्या विचारांनी प्रेरित असून त्याने गुरुदेव सेवा मंडळात सहभाग घेत शालेय विद्यार्थ्यांकरिता विविध उपक्रम राबविले आहेत. त्याने नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थीदेखील स्पर्धा परीक्षा देऊ शकले पाहिजेत म्हणून आदिवासी नक्षलग्रस्त भागात वाचनालय उभारत सामाजिक बांधिलकी जोपसली, तर आजच्या युगात आई वडिल मुलांना फक्त बाल संस्कार देतात मात्र आजची तरुणाई विवाह संस्कार सोहळा विसरल्याने कुलपदीने अनोखा विवाह सोहळा करणायचा निर्णय घेतला.

गोंदियात अनोखा विवाहसोहळा

सुरूवातीला त्याच्या भावी वधूने याला नकार दिला. मात्र समजूत घातल्यावर तिला देखील हे विचार पटले आणि विवाह संस्कार सोहळ्याला ती तयार झाली. मग काय मातृदिनाचे औचित्य साधून हा अनोखा विवाह संस्कार सोहळा पार पडला. वऱ्हाडी लग्न मंडपात पोहचताच पुरुषांना बेटी बचाव, बेटी पढाओ तर महिलांना सप्तपदी स्वछ्तेची असे बॅच लावण्यात आले. एकीकडे स्वच्छ भारतचा संदेश देणारा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला तर दुसरीकडे राष्ट्र संतांचे विवाह संस्कार सांगणारे पोस्टर लावून स्टेजवर फुलांची सजावट न करता विवाह संस्कार सोहळ्याचा फलक लावण्यात आला. वऱ्हाड्यांच्या मनोरंजनासाठी संतांच्या विचारांचे भजन आणि अभंग सुरु होते. या विवाह सोहळ्याची जिल्ह्यात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 13-05-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GONDIA_13.MAY.19_ANOKHA WEDDING SOHALA SOCIAL MSG
गोंदियात विवाह सोहळ्यातून दिला बेटी बचाव, बेटी पढाओ, स्वछ भारत चा दिला संदेश
Anchor :- गोंदिया जिल्याच्या आदिवासी बहुल नक्षल ग्रस्थ देवरी तालुक्यात राहणाऱ्या कुलदीप लांजेवार या तरुणाने आपल्या विवाह संस्कार सोहळ्यातून बेटी बचाओ, बेटी पढाओ तसेच स्वछ भारत चा संदेश दिल्याने लग्नाला आलेले वऱ्हाळी लग्न मंडपात पोहचताच दंग झाले, चला तर पाहूया ईटीव्ही भारत माध्यमाने कश्या पद्धतीने हा अनोखा विवाह संसकार सोहळा पार पडला
VO :- देवरी तालुक्यात राहणाऱ्या कुलदीप हा लहान पणा पासूनच वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महराजांच्या विचारांशी प्रेरीत असून. त्याने गुरुदेव सेवा मंडळात सहभाग घेत शालेय विद्यार्थ्यांना करिता विविध उपक्रम राबविले, नक्षल ग्रस्थ भागातील विद्यार्थी देखील स्पर्धा परीक्षा देऊ शकले पाहिजे म्हणून आदिवासी नक्षल ग्रस्थ भागात वाचनालय उभारत सामाजिक बांधिलकी जोपसली, तर आजच्या युगात आई वडिल मुलांना फक्त बाल संस्कार देतात मात्र आजची तरुणाई विवाह संस्कार सोहळा विसरल्याने कुलपदीने राष्ट्र संत तुकडोजी महराजांच्या विचार जोपासत आपला अनोखा विवाह सोहळा करणायचा ठरविले, सुरवातीला त्याच्या भाऊ वधूने देखील याला नकार दिला, मात्र भाऊ वधूची समजूत घातल्यावर तिला देखील संतांचे विचार पटले आणि विवाह संस्कार सोहळ्याला तयार झाली, "मग काय मातृत्व दिनाचे अवचित्त साधून हा अनोखा विवाह संस्कार" सोहळ्याला सुरवात झाली ,वऱ्हाळी लग्न मंडपात पोहचताच पुरुषांना बेटी बचाव, बेटी पढाओ तर महिलांना सप्तपदी स्वछ्तेची असे ब्याचेस लावण्यात आले, तर एकीकडे स्वच भारत चा संदेश देणारा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला तर दुसरीकडे राष्ट्र संतांचे विवाह संस्कार सांगणारे पोस्टर, तर स्टेज वर फुलांची सजावट न करता विवाह संस्कार सोहळा चा फलक लावण्यात आला असून वऱ्हाळ्याचा मनोरंजना करिता संतांच्या विचाराचे अभंग आणि भजन सुरु होती .
BYTE :- कुलदीप लांजेवावर (सामाजिक संदेश देणार वर)
BYTE :- कल्याणी लांजेवार (बेटी बचाव बेटी पढाओ चा संदेश देणारी वधू)
VO :- तर कुलदीप यांनी आपली लग्न पत्रिकेतून देखील संतांचे विचार, बेटी पढाओ बेटी बचाओ स्वछ भारत चा संदेश दिला तर लग्नात येताना भेट वस्तू ऐवजी शैक्षणिक साहित्य घेऊन या असे नमूद केले तर वऱ्हाळ्यानी देखील याला प्रतिसाद देत लग्नात शैक्षणीक साहित्य घेऊन आले तर आपल्या गावात स्वच्छता मोहीम राबवित असलेल्या स्वच्छता कामगारांचा देखील संतांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
BYTE :- सविता पुराम (माजी जिल्हा परिषद सभापती)
VO :- तर लग्नात आलेले वऱ्हाळी देखील अनोखा विवाह संस्कार सोहळा पाहून आंनदी झाले असून गुरुदेव सेवा आश्रम मोर्सी येथून आलेल्या संतांनी उपस्थित वर्ह्याळ्याना संतांचे विचार पटवत मार्दर्शन केले असून सध्या या विवाह सोहळ्याची चर्चा जिल्यात सर्वत्र सुरु आहे. Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.